शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लावारी येथील सरपंच व उपसरपंचांचा सत्कार

By admin | Updated: April 27, 2016 00:55 IST

चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर पंचायत समितीमधील लावारी ग्रामपंचायतीने नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिली.

पंचायत राज दिन : केंद्र सरकारचा बल्लारपूर पंचायत समितीला बहुमानबल्लारपूर : चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर पंचायत समितीमधील लावारी ग्रामपंचायतीने नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिली. याबद्दल केंद्र सरकारच्या पंचायत मंत्रालयाच्या वतीने पंचायत राज दिनाचे औचित्य साधून येथील कार्यक्रमात लावारी येथील सरपंच वैशाली पोतराजे व उपसरपंच धीरज निरंजने यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून रविवारी सत्कार करण्यात आला. लावारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र सरकारचा बहुमान बल्लारपूर पंचायत समितीला मिळाला आहे.ग्राम विकासाला चालना देण्यासाठी लावारी ग्रामपंचायतीने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. भारत निर्माण कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा दिली. ग्रामपंचायत स्तरावरील कारभार आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून परिणामकारक केंद्र सुरू केले. ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक दाखले व प्रमाणपत्र संगणिकृत देण्याचे धोरण आखण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शिकता निर्माण होण्यास मदत मिळाली. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट कार्य लोकसहभागातून ग्रामपंचायतीने केले. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने येथील ग्रामपंचायतीच्या कामाची दखल घेतली. पंचायत राज संस्था स्तरावर पारदर्शकता निर्माण करून कामकाजाचे सशस्तीकरण करण्यास मोलाचे योगदान दिले. राज्यातील ५७.६ टक्के ग्रामीण भागातील जनतेला प्रेरणादायी ठरणारा उपक्रम ग्रामपंचायतीने राबविला. ग्रामपंचायतीची ग्राम विकासातल्या महत्त्वाच्या भूमिकेला अनुसरुन बल्लारपूर पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, लावारी येथील सरपंच वैशाली योगेश पोतराजे, उपसरपंच धीरज निरंजने, ग्रामसेवक वर्षा मानकर यांचा केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करुन गौरव केला आहे. हागणदारीमुक्त अभियानात राज्य स्तरावर तर पंचायत राज संस्था स्तरावर केंद्र सरकारतर्फे हा बहुमान मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)