शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्तावर लग्न लावणाऱ्या वर-वधू पित्याचा सत्कार

By admin | Updated: May 6, 2016 01:01 IST

येथे वेळेवर लग्न लावणाऱ्या वर-वधू पित्याचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बुधवारी सत्कार केला.

राजुरा : येथे वेळेवर लग्न लावणाऱ्या वर-वधू पित्याचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बुधवारी सत्कार केला. सध्या सर्वत्र लग्न समारंभाचा धूमधडाका सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावण्यासाठी ज्योतिष्य, पंडितांकडून मुहूर्तसुद्धा काढून घेत आहेत. मुहूर्तावर सर्व पाहुणे मंडळी येतात. परंतु नवरदेव वऱ्हाड घेऊन वेळेवर लग्न मंडपात पोहचत नसल्याने कडाक्याच्या उन्हात वर-वधू पक्षाकडील पाहुण्यांना ताटकळत रहावे लागते. पर्यायाने वेळ वाया जातो. काही लग्ने साग्रसंगीत असतात. त्यामुळे वऱ्हाड्यांचे मनोरंजनही होते. परंतु जे लोक वेळ काढून लग्नाला आलेले असतात. त्यांना अकारण तासन्तास ताटकळत बसावे लागते. विशेषत: मोठा समाज म्हणून ज्या कुणबी समाजाकडे पाहिले जाते, त्या समाजातीलही लग्न वेळेवर लागत नाहीत, अशी चर्चा असते. परंतु राजुरा येथे बुधवारी माधवराव रासेकर यांचे चिरंजीव आशिष व गडचांदूर येथील विठ्ठलराव थिपे यांची कन्या शितल यांचा विवाह तंतोतंत मुहूर्तावर लावण्यात आला. त्यामुळे या लग्न समारंभाला उपस्थित असलेले राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दादा पाटील लांडे यांच्याशी चर्चा करून समाजात या निमित्ताने चांगला संदेश जावा, यासाठी वर व वधू पित्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माजी आमदार सुभाष धोटे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)