शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात वडील व मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:17 IST

येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर फाट्याजवळील हायवे रोडवरील नाल्यावर धानाने भरलेल्या ट्रकची दुचाकी वाहनाला धडक बसली. यात दुचाकीवरील वडील व त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देमुलगी जागीच दगावली : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.): येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर फाट्याजवळील हायवे रोडवरील नाल्यावर धानाने भरलेल्या ट्रकची दुचाकी वाहनाला धडक बसली. यात दुचाकीवरील वडील व त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी सकाळी घडली.सकाळी ७ वाजताच्या सुमारास धानाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच- ४० एन- ३९९४) भरधाव वेगाने तळोधीकडे जात होता. जनकापूर नाल्याजवळ भरधाव वेगाने असलेल्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला (क्रमांक एमएच- ३४ बीजे १६९१) धडक दिली.यात भुनेश्वरी मंगेश नागोसे (३) हिचा जागीच मृत्यू झाला तर तिचे वडील मंगेश गजानन नागोसे (३५) रा. किटाळी बोरमाळा तह. नागभीड गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र त्यांचाही वाटेत मृत्यू झाला.घटनेनंतर ट्रॅकचालक पसार होण्याच्या प्रयत्नात असताना अचानक ट्रकही उलटला. त्यानंतर ट्रकचालक पसार झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच ट्रकचालक रुपेश कुशल ठाकरे (२२) रा. तिरडी (भंडारा) याला पोलिसांनी अटक केली.