शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त कामगारांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच

By admin | Updated: March 27, 2017 00:38 IST

उसेगाव, शेणगाव, वढा, घुग्घुस आणि पांढरकवडा या हद्दीतील गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

चंद्रपूर : उसेगाव, शेणगाव, वढा, घुग्घुस आणि पांढरकवडा या हद्दीतील गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज सहाव्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान, सोमवारी कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी नागपूर येथील अप्पर सहायक कामगार आयुक्तांकडे सोमवार २७ मार्चला तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. २००८ साली उसेगाव, शेणगाव, वढा, घुग्घुस आणि पांढरकवडा या हद्दीतील सुमारे ३०० ते ३५० एकर शेतजमीन स्थायी स्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून अगदी अल्पदरात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आल्या. त्या मोबदल्यात १०३ प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात आली. मात्र मागील साडेतीन वर्षापासून प्रकल्पग्रस्त कामगारांना २६ दिवसांऐवजी सदर आस्थापनेत २० दिवसांची सेवा देण्यात येत आहे. या २० दिवसांचे वेतन ५ हजार देण्यात येत असून ते चार चार महिने थकीत असते. याविषयी कामगार आयुक्त कार्यालय येथे वारंवार बैठकी झाल्या. यावेळी कामगारांचे वेतन अदा करण्याची जबाबदारी मुख्य व्यवस्थानाची असल्याचे सांगण्यात आले. यावेळीसुद्धा आंदोलन करण्यात आले होते. त्यामध्ये कामगारांची दिशाभूल, फसवणूक करीत निष्फळ आश्वासने देत उपोषण सोडविण्यात आले होते. परंतु सात दिवसाच्या आत चार महिन्याचे वेतन मिळवून देण्याचे व सदर आस्थापनेत सुरक्षा रक्षकाचे काम मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने एक महिना होऊनही पूर्ण केले नाही. त्यामुळे कामगार आर्थिक व मानसिकरित्या त्रास झाला आहे. अखेर प्रकल्पग्रस्त कामगारांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. मागील पाच महिन्याचे थकीत वेतन देण्यात यावे, सदर आस्थापनेत महिन्याचे २६ दिवस रोजगार देण्यात यावे, सुरक्षा साधने देण्यात यावे, करारानुसार वेतन देण्यात यावे, महिन्याचे वेतन सात ते १० तारखेच्या आत देण्यात यावे. कुशल कामगार १८ हजार, अर्धकुशल कामगार १६ हजार, अकुशल कामगार १४ हजार प्रति महिना पगारवाढ देण्यात यावी, या त्यांच्या मागण्या आहे. दरम्यान, या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी २३ मार्चला सहायक कामगार आयुक्तांकडे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कामगार प्रतिनिधी हजर होते. परंतु कंपनी व्यवस्थापनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते. आता २७ मार्चला बैठक आयोजित केली आहे. (शहर प्रतिनिधी)