शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील पऱ्हाला कावडीने पाणी

By admin | Updated: July 11, 2015 01:41 IST

मूल: पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतात धानाचे पेरलेले पऱ्हे करपायला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागले आहे.

प्रेरणादायी : जुनासुर्ला येथील शेतकऱ्याचा पिके जगविण्याचा प्रयत्नमूल: पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतात धानाचे पेरलेले पऱ्हे करपायला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागले आहे. मात्र मूल तालुक्यातील मुर्लीधर आत्माराम लोडेल्लीवार या शेतकऱ्याने खचून न जाता गुंड व कावडीने धानाच्या पऱ्ह्यांना पाणीपुरवठा करुन पऱ्हांना जीवनदान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकरी शेतात राब राबतो. कर्ज काढून पिकविलेल्या शेतातून धानाला पाहिजे त्या प्रमाणात भाव दिला जात नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीचे पालन पोषण करण्याचा यक्ष प्रश्न उभा ठाकतो. मात्र पोटाची खडगी भरण्यासाठी व गरजांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतो. मूल तालुक्यात १४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. पाऊस समाधानकारक आल्यानंतर पेरणी करण्यासाठी धावपळ सुरु झाली. सारी कामे बाजूला सारुन शेतकऱ्यांनी प्रथमत: शेतीमध्ये धानाची पेरणी केली. मात्र धानाच्या पेरणीनंतर वरुणराजाची अवकृपा झाली. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पऱ्हे करपायला लागली आहे. शेतकरी पाऊस येण्याची आतूरतेने वाट बघत असताना मात्र वरुणराजाची अपकृपाच शेतकऱ्यांवर असल्याचे जाणवले. दुबार पेरणी होऊ नये, यासाठी जुनासूर्ला येथील मुर्लीधर आत्माराम लोडेल्लीवार या शेतकऱ्याने मजुरांकरवी जवळ असलेल्या तलावातील पाणी गुंड व कावडीने टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सदर प्रयत्न सफल होईल की नाही, हा नंतरचा प्रश्न असला तरी लोडेल्लीवारसारखे शेतकरी शेतीसाठी प्रयत्नरत असल्याने इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. एकीकडे पावसाची दडी, दुसरीकडे कर्जाचा बोजा तर तिसरीकडे मजुरीने गुंड व कावडीने पाणी टाकण्यासाठी केलेला प्रयत्न यामुळे शेतकरी खचला असला तरी आपली हिंमत सोडली नाही, हेच यावरुन दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)