शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:09 IST

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावावरील वेस्टवेअरची उंची वाढविल्यामुळे परिसरातील ५० एकर शेती पाण्यात जाणार आहे. त्यामुळे धानउत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे वेस्टवेअरची उंची त्वरित कमी करावी, या मागणीसाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयात ठिय्या मांडला.

ठळक मुद्देवेस्टवेअरची उंची कमी करा : उपविभागीय अभियंत्यांना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावावरील वेस्टवेअरची उंची वाढविल्यामुळे परिसरातील ५० एकर शेती पाण्यात जाणार आहे. त्यामुळे धानउत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे वेस्टवेअरची उंची त्वरित कमी करावी, या मागणीसाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयात ठिय्या मांडला.सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे मामा तलाव आहे. येथील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी वेस्टवेअरचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात लगतचे शेत संपूर्ण पाण्याखाली जाते. त्यावर धानपिकाची शेती करणे अत्यंत कठीण होते. मात्र या शेतकºयांना अद्याप याचा मोबदला मिळालेला नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी या शेतकºयांना कुठलीही पूर्वसूचना न देता वेस्टवेअरची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे शेतीचे नुकसान वाढले असून जवळपास ५० एकर शेती पाण्याखाली जाणार असे शेतकºयांचे म्हणणे आहे. शेतीच्या भरोशावर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट चंद्रपूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयात धडकले. यावेळी त्यांनी उपविभागीय अभियंता विनोद घंगारे यांना घेराव घातला. विभागाकडून निव्वळ पिकाची नुकसान भरपाई दिली जाते. ही जमीन संपादित करून त्याचा पूर्ण मोबदला आम्हाला देण्यात यावा, अतिरिक्त बांधकाम त्वरित काढण्यात यावे, अन्यथा आम्हीच पर्यायी व्यवस्था करू, असा इशाराही यावेळी शेतकºयांनी दिला. यावेळी आक्रोश खोब्रागडे, गुरुदास मेश्राम, रघुनाथ बन्सोड, रवींद्र बोडेवार, किसन बोरकर, प्रभाकर बोरकर आदी उपस्थित होते.