शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बंद केले रस्त्याचे काम

By admin | Updated: April 15, 2017 00:46 IST

पांदण रस्त्यामुळे वडिलोपार्जित शेतजमिनीचे नुकसान होत असल्याने शेतातून जाणारा २ किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडल्याचा प्रकार निलसनी पेडगाव येथे घडला.

निलसनी पेडगाव येथील घटना : पांदण रस्त्यामुळे शेतीची विभागणीचंद्रपूर : पांदण रस्त्यामुळे वडिलोपार्जित शेतजमिनीचे नुकसान होत असल्याने शेतातून जाणारा २ किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडल्याचा प्रकार निलसनी पेडगाव येथे घडला.निलसनी पेडगाव ग्रामपंचायतअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पांदण रस्त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले. शासनाच्या ध्येय धोरणानुसार या पांदण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, या रस्त्यासाठी शेतकऱ्यांची परवानगी घेण्यात आली नाही. रस्त्याचे कोणतेही सीमांकन न करता बेधडक रस्ता सुरू करण्यात आला. त्यामुळे शेतीचे नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि पांदण रस्त्याचे काम बंद पाडले. पांदण रस्ता म्हणून १९७८ पासून शासकीय दप्तरात कोणतीही नोंद नसताना भूमापन क्रमांक २७८ या शेतशिवारातून रस्त्याची निर्मिती करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले. हा पांदण रस्ता निखिल रेप्पलवार, सुधीर मेश्राम, भाकरे अशा अनेक शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेतीतून जात असल्याने शेतीचे दोन तुकड्यांत विभाजन होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा या पांदण रस्त्याला विरोध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असताना सोबतच हा रस्ता १९२० च्या बंदोबस्तानुसार नोंद असला तरी महसूल रेकॉर्डला याची नोंद नसल्याने हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.दरम्यान, रस्त्याची पाहणी करण्याकरिता महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. रेकॉर्डला नोंद नसल्यामुळे तहसील कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)