शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

पूल नसल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST

शेताकडे जाणारा गावातील हा मुख्य मार्ग असल्याने अनेक शेतकरी याच मार्गाने ये-जा करतात. शेतात साहित्य नेण्याकरिता शेतकऱ्यांना चारचाकी तसेच ...

शेताकडे जाणारा गावातील हा मुख्य मार्ग असल्याने अनेक शेतकरी याच मार्गाने ये-जा करतात. शेतात साहित्य नेण्याकरिता शेतकऱ्यांना चारचाकी तसेच बैलगाडीचा वापर करावा लागतो. मात्र, नाल्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाच्या मागणीसाठी अनेकदा गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे निवेदने सादर केली. मात्र, अद्यापही पुलाचे बांधकाम सुरू झालेले नाही. परिसरातील आसन खुर्द, लालगुडा, राजूरगुडा, कढोली आदी गावांना जोडणारा हा रस्ता गडचांदूर- कोरपना मार्गाला जोडणारा आहे. परंतु, पुलाअभावी प्रवाशांनासुद्धा ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. जवळपास ७० मीटर अंतराचा हा पूल बांधकामाकरिता याआधी जलसंधारण विभागाने पाहणी केली. साधारणत: दोन कोटी अंदाजित खर्च या कामाकरिता लागणार असल्याचे सदर विभागाचे म्हणणे आहे. पावसाळ्यात हा पूल नसल्याने शेतकऱ्यांना पुराचा सामना करावा लागत आहे. धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे बाराही महिने या नाल्यात पाणी असते. पूल-कम-बंधारा असे काम झाल्यास जवळपास २०० हेक्‍टरवरील शेतकऱ्यांना या पाण्याचा सिंचनाकरिता वापर होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.