शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पणन महासंघाला नाकारले

By admin | Updated: January 8, 2016 01:49 IST

कापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले ....

कापूस दरवाढीचा व्यापाऱ्यांना लाभ : खासगी बाजारपेठेत चार हजार ८०० रुपये भाव प्रकाश काळे गोवरीकापसाचे दर आज ना उद्या वाढेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापूस दरवाढीचे कोणतेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री केली. कापूस सरतेशेवटी खासगी बाजारपेठेत कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी चक्क पणन महासंघाला कापूस विकण्यास नकार देत खासगी व्यापाऱ्यांकडे धाव घेतली आहे.कापूस शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची भिस्त कापूस या एकमेव पिकावर अवलंबून असते. यावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारीने कर्ज घेऊन शेती केली. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करुन कशीबशी शेती पिकविली. परंतु यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतीवर केलेला खर्च भरुन निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे. शेतीवर अतोनात खर्च करुनही उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर असलेला कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कर्ज घेऊन शेती केल्यानंतर घामाच्या दामासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु झाला. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी कायमची निराशाच आली. हिवाळी अधिवेशनानंतर शेतमालाचे दर वाढतील, या आशेवर शेतकरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरात जागा नसतानाही अडचण सहन करीत कापूस भरुन ठेवला. परंतु त्यानंतर कापूस दरवाढीची आस कायमची संपल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कापसाची कवडीमोल भावात नाईलाजाने विक्री करुन आपली अडचण भागविली. शेतकऱ्यांच्या घरी असलेला कापूस आता संपायला आला असताना खासगी बाजारपेठेत कापसाला प्रति क्विंटल चार हजार ८०० ते आठशे रुपये दर देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी कापूस खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे पाठ फिरविली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी असल्याने पाकिस्तान, बांग्लादेश, इंडोनेशिया या देशात भारतीय कापूस निर्यात होत आहे. त्यामुळे खासगी बाजारपेठेत कापसाला सुगीचे दिवस आले आहे. हमीभावावर कापसाची कवडीमोल भावात खरेदी करणाऱ्या पणन महासंघाकडे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास चक्क नकार दिल्याने सरकारी कापूस संकलन केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट पसरला आहे. जिनिंग ओस पडल्या आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाला चांगला दर मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. त्याचा पूरेपूर फायदा खासगी व्यापारी उचलत आहे. कापसाची वाढती आवक पाहून व्यापारी कापसाचे भाव पाडत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.कापूस दरवाढीचा फायदा कुणाला?शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपत असताना खासगी बाजारात कापसाचे दर वाढले आहे. गरजेपोटी कवडीमोल भावात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री आहे. आज ना उद्या कापूस दरवाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी आर्थिक चणचण असतानाही पोटाला चिमटा घेत दिवस काढले. आता शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला असून कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे.कापूस विदर्भातील शेतकऱ्यांचे नगदी पिक आहे. मायबाप सरकारने कापसाला तोकडा हमीभाव दिला. त्यामुळे शेतीवर केलेला खर्च भरुन निघाला नाही. आता खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले आहे. मात्र शेतकऱ्यांजवळ कापूस उरला नसल्याने कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ व्यापाऱ्यांना होणार आहे.- सुनील पिंपळशेंडे, शेतकरी, वनोजा