शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य न्यायाधीशांना शेतकऱ्यांचे पत्र

By admin | Updated: March 5, 2016 00:49 IST

शेतकरी, शेतमजूर संपूर्ण शेतीवर अवलंबून असून केवळ शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवितात.

मूल : शेतकरी, शेतमजूर संपूर्ण शेतीवर अवलंबून असून केवळ शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवितात. परंतु, शासन शेतकऱ्यांना पाहिजे त्या सुविधा देत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाच्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध शेतकरी- शेतमजूर कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या समर्थनार्थ मूल तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्त्वात मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवून न्यायाची अपेक्षा केली आहे.शेतकऱ्याला शेतामध्ये उत्पादन घेत असताना खर्चाच्या बाबतीत अनेक पटीने वाढ झाली आहे. परंतु, आर्थिक उत्पनात वाढ होताना दिसत नाही, नैसर्गिकदृष्ट्या बेभरवशाची, आर्थिकदृष्ट्या तोट्याची व अनिश्चित बाजाराच्या स्थितीमुळे तसेच सध्याच्या सरकारच्या दिशाहीन शेती धोरणामुळे कर्जाचे ओझे वाढत आहे. दररोजच्या जीवनाश्यक गरजाही भागविणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांनी मुख्य न्यायाधीशांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.शेतातील पेरणी ते काढणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेंतर्गत होणे आवश्यक आहे. डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागु होणे आवश्यक असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. भविष्यात आत्महत्येचा गंभीर प्रश्न सुटावे यासाठी शेतकरी-शेतमजूर कृती समितीचे संयोजक आमदार शंकर अण्णा धोंडगे, किशोर माथनकर यांनी नागपूर खंडपीठामध्ये जनहित यााचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या समर्थनार्थ मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोष्ट कार्यालयात जाऊन पत्राच्या माध्यमातून मुख्य न्यायाधीशांना घटनात्मक अधिकाराचा वापर करुन न्याय देण्याची विनंती केली आहे. यावेळी सुमित समर्थ, मंगेश पोटवार, संजय येरोजवार, वर्षा लोनबले, ममता गोजे, विकास गेडाम, महेश कटकमवार, गजापुरे, गुरुनुले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)