शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी जाणून घेतली आधुनिक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:11 IST

पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील गोरजा गावाच्या स्वयंप्रेरणेतून पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा नुकताच पार पडला़

ठळक मुद्देअभ्यास दौरा : मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील गोरजा गावाच्या स्वयंप्रेरणेतून पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा नुकताच पार पडला़ या दौऱ्यात शेतकऱ्यांनी आदर्श गाव, कृषी विद्यापीठ, सहकारी शेती, पाणलोट प्रकल्पांची पाहणी करून आधुनिक शेतीचे धडे घेतले़प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष गिरडे, सहसमन्वयक प्रा. किरणकुमार मनुरे यांनी जबाबदारी स्वीकारली होती़ अभ्यास दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेती, बचत गटातील पुरुष, महिला, युवक, छत्रपती शिवाजी महाराज पाणी वाटप संस्था गोरजा, अध्यक्ष सचिव, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांची माहिती शेतकऱ्यांनी जाणून घेतली़राळेगाव सिद्धी, आदर्श गाव पाटोदा, सहकारी शेती करणारी इंगेगाव, जिल्हा परळी, परभणी कृषी विद्यापीठ व राहुरी कृषी विद्यापीठांना भेट दिली़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विकासाच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली़ गावाच्या हितासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, यावर शेतकºयांनी संवाद साधला़ राळेगाव सिद्धी गावाची माहिती घेतल्यानंतर अण्णांच्या भेटीसाठी आतुर असणारे व त्यांचे मार्गदर्शन लाभेल की नाही यावर सर्वांचा प्रश्न होता. कारण अण्णांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे ते भेटणार नाही, असे वाटले होते. पण चंद्रपूर जिल्ह्यातून आदर्श गाव संकल्पनेतून स्वयंप्रेरणा घेवून शेतकरी आल्याचे कळताच अण्णांनी भेटीचा वेळ दिला़ शेतकरी व महिलांशी दिलखुलास चर्चा केली़ शेतीकरिता पाण्याचा योग्य वापर करावा़ महिलांनी संघटित होवून व्यसनमुक्त गाव, नियमित ग्रामसभा तसेच शुद्ध आचारविचार, शुद्ध चरित्र, त्यागावर आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा़, असे मत अण्णा हजारे यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले़ स्वत:सोबतच गावाचा विचार करुन जात व धर्मभाव न पाळता एकत्र यावे, असा मुलमंत्र जिल्ह्यातील शेतकºयांना दिला़ गावाच्या विकासाकरिता हा अभ्यास दौरा प्रेरणादायी असून शेती आणि गावात विविध प्रकल्प राबविताना अंमलात आणू, असा संकल्प शेतकºयांनी केला़