शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील पिके लागली कोमेजू

By admin | Updated: August 17, 2014 23:04 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असृन दुबार-तिबार पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे.

रत्नाकर चटप - लखमापूरगेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असृन दुबार-तिबार पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे.खरीपाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली. त्यानंतर पावसाने हजेरी न लावल्याने बीज अंकुरण्याची प्रक्रिया मंदावली तर काही ठिकाणी बी सडून गेले. यातच आर्थिक फटका सहन करीत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. परंतु आता पावसाने हुलकावणी दिल्याने शेतात उभ्या रोपट्यांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असल्याने पिकांना पाणी दिले जात आहे. मात्र पाण्याची पातळी खालावत असल्याने मुबलक पाणी पिकांना देता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पुराने नदीलगतच्या शेतकऱ्यांचे उभे पिक वाहून गेले तर रब्बी हंगाम अकाली पावसाने कहर केल्याने पुन्हा नापिकीचा सामना करावा लागला. यातच अनेक शेतकऱ्यांनी उधारवाडी करून व बँकेचे कर्ज घेऊन चालू हंगामात बि-बियाणे व शेतीउपयोगी साधनांची खरेदी केली. परंतु या सर्व कष्टावर पाणी फेरले जात असून यावर्षी दुष्काळस्थिती डोळ्यासमोर दिसत असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. सद्यस्थितीत शेतात हिरवी पिके उभी दिसत असली तरी वाढ मात्र खुंटली आहे. आतापर्यंत कापूस, सोयाबीन पिकांना फळधारणेची अवस्था यायला हवी होती. मात्र पावसाअभावी दुबार-तिबार पेरणी करावी लागत असते. पिकांची अवस्था बिकट असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबरोबर काही शेतामध्ये झाडाची पाने पिवळी-तपकिरी दिसत असून रोगाचे सावट काही अंशी दिसत आहे. पिकांना पाणीच नसल्याने फवारण्या मंदावल्या असून उभी पिके कोमेजण्याची शक्यता आहे. गेल्या आठ-पंधरा दिवसात आकाशात ढग दिसत असले तरी प्रत्यक्षात पाण्याचा जोर मात्र मंदावला आहे.शेतकऱ्यांनी सुरूवातीला अनेक महागडी बियाणे पेरून व नविन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक पिक घेण्याच्या ध्येयाने आगेकुच केली. मात्र आताही निसर्गराजाची अवकृपा दिसत नसल्याने शेतपिके संकटात सापडली आहे. अनेक वर्षांपासून शेतीत कसणाऱ्या बळीराजाची अवस्था गंभीर आहे. पिकलं ते विकलं जात नाही, अशी अवस्था आहे.काही प्रमाणात पाऊस अधूनमधून येत असला तरी पाहिजे त्या प्रमाणात जमिनीत ओलावा दिसत नाही. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी धावपळ सुरू केली असली तरी पाणीच नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात कापूस, सोयाबीन मिरची तूर आदी नगदी पिके घेतली जातात. या पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. पाण्याशिवाय झाडाची वाढ तसेच उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. याउलट गेल्या वर्षीपासून निसर्गाने साथ न दिल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे.दुबार-तिबार पेरणी करून शेतकऱ्यांनी पिके जगवली असली तरी वातावरणातील उष्णता बघता पिके नष्ट घेण्याच्या मार्गावर आहे. अशातच पावसाचा वेग वाढला नाही तर पाण्याअभावी डोळ्यादेखत पिकांची हाणी होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.