शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धरणे आंदोलन

By admin | Updated: June 11, 2017 00:29 IST

शेतकरी बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेल्या संपाच्या समर्थनार्थ संपूर्ण कर्जमाफी व शेतमाला हमीभाव मिळावा,....

विजय वडेट्टीवार : कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीलोकमत न्यूज नेटवर्कतळोधी(बा) : शेतकरी बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेल्या संपाच्या समर्थनार्थ संपूर्ण कर्जमाफी व शेतमाला हमीभाव मिळावा, याकरिता तळोधी(बा) येथील महात्मा फुले चौकात काँग्रेसेच विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी आ. वडेट्टीवार यांनी म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत ‘अच्छे दिना’च्या नावाखाली सत्ता भोगून खुर्ची हडप केली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे नेते चूप झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी नि:स्वार्थपणे उभे आहोत. या आंदोलनात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. वडेट्टीवार यांनी केले. जिल्हा परिषदेचे गटनेते व माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर सांगितले की, निवडणुकीपूर्वी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून सत्ता भोगण्याचे षडयंत्र करण्यात आले. या भागातील शेतकरी, शेतमजुरांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकार कर्जमाफी व हमी भावाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे सरकारचे धोरण शेतकरी, शेतमजूरविरोधी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी, धानाला किमान तीन हजार रुपये भाव, स्वामीनाथन आयोग त्वरित लागू करा, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे संपूर्ण वीज देयक माफ करावे, घरकूल, सिंचन विहिरी, शौचालय, गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात टाकणे आदी मागण्याकरिता धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, जि.प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, नयना गेडाम, माजी पं.स. सदस्य विजय गावंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष विनोद बोरकर, नगरसेवक दिनेश गावंडे, रंजना पेंदाम, अशोक ताटकर, विलास लांजेवार, वसंतराव बडवाईक, वामनराव मदनकर, नगरसेवक शिरीष वानखेडे, नागभीड किसान सेल अध्यक्ष आनंद भरडकर आदी उपस्थित होते.