शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिमूरच्या पंचक्रोशीतील प्रसिद्ध मखराचा बैल

By admin | Updated: September 12, 2015 00:53 IST

चिमूर तालुक्यातील शंकरपुरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरुअसलेली मकर बैलाच्या पोळ्याची परंपरा आजही कायम आहे.

चिमूर तालुक्यातील शंकरपुरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरुअसलेली मकर बैलाच्या पोळ्याची परंपरा आजही कायम आहे. मकर बैलामुळे गावावर कोणतीच आपत्ती येत नसल्याची अनेकांची श्रद्धा आहे.शंकरपूर येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशमुख पाटील यांच्या वाड्यातून मकरबैल निघण्याची प्रथा आहे. त्यांनी आपला वाडा व शेती डहाके परिवाराला विकले. देशमुख परिवाराने चालविलेली प्रथा आजही डहाके परिवार आनंदाने व श्रद्धेने चालवित आहे. डहाके यांच्या वाड्यात बैलाला सांजसिंगाराने सजविले जाते व नंतर त्यांच्या डोक्यावर मकर ठेवले जाते. हे मकर लाकडापासून बनविले जात असून षटकोणी आकाराचे असते. प्रत्येक कोणात दिवा लावण्यासाठी जागा तयार करण्यात येते. त्या कोणात पेटता दिवा ठेवल्या जाते. हा लाकडाचा मकर बैलाच्या मानेवर व डोक्यावर ठेवल्या जाते. बँड वाजाच्या पथकात हा मकराचा बैल पोळा भरतो, त्या ठिकाणी आणल्या जाते. तिथे भक्तीभावाने पूजा केल्यानंतर समोर मकराचा बैल व त्यानंतर इतर बैलाच्या जोड्या असतात. तोरण बांधलेल्या ठिकाणापर्यंत असेच चालत येतात. आंब्याच्या पानाचे तोरण तोडल्यानंतर हा मकराचा बैल हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी नेतात. तेथून पोळा फूटला असे गृहीत धरल्या जाते. मकराच्या बैलाला विशेष मान असल्यामुळे त्या बैलाच्या समोर कोणतीच बैल जोडी जात नसते. हा मकर बैल परिसरात कुठेच निघत नसल्याने पंचक्रोशीतली जनता शंकरपूर येथे येतात. या मकर मुळे गावावर कोणतीच आपत्ती येत नाही. तसेच जणावरांना सुदृढ आरोग्य लाभते असे अनेकांचे म्हणणे आहे. मकरावर ठेवण्यात आलेल्या दिव्याचा आशिर्वाद घेण्यासाठी जनतेत चढाओढ असते.