शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबस्तर संवाद अभियान प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:30 IST

गावागावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत आहे. रोगांचा समूळ नायनाट करायचा असल्यास प्रत्येकानी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेऊन जागृत राहिले पाहिजे.

संध्या गुरुनुले : स्वच्छतेतून रोगांचे निर्मूलन शक्यमूल : गावागावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत आहे. रोगांचा समूळ नायनाट करायचा असल्यास प्रत्येकानी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेऊन जागृत राहिले पाहिजे. तेव्हाच आरोग्य सुरक्षित राखता येईल. आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी स्वच्छतेशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी केले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय कुटुंबस्तर संवाद अभियानाचा प्रारंभ मूल तालुक्यातील डोंगरगाव येथून करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी आपल्या भाषणातून दरवर्र्षीे १५ लाख रुग्ण अस्वच्छतेच्या सवयीमुळे दगावत असल्याचे सांगून त्यांनी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. याशिवाय संतांनी घालून दिलेल्या विचारातून गावाचा विकास करावा, असे त्यांनी आवाहन केले. तसेच अस्वच्छतेचा जादुई प्रयोग स्वत: सिंह यांनी करून दाखविली. या प्रयोगातून घाण आपल्या पोटात कशी जाते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते यांनी केले. मोहिते यांनी कुटुंबस्तर संवाद अभियानाविषयी प्रास्ताविकातून मांडण्यात आले.कार्यक्रमात डोंगरगावचे सरपंच मुकेश गेडाम व गटविकास अधिकारी दिलीप पांढरवडे यांनीही मार्गदर्शन केले. गावात भव्य स्वच्छता रॅली, शौचालयाच्या कामाचे भूमीपूजन, शौचालयाचा शुभारंभ, गृहभेटी, स्वच्छता सभा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला स्वच्छ भारत मिशनचे आयईसी कृष्णकांत खानझोडे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, स्वच्छता तज्ञ तृशांत शेंडे, विस्तार अधिकारी जयेश रारूत, राजू परसावार, बीआरसी हर्षवर्धन गजभिये, सचिन येरमलवार, मूल तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, गावातील सर्व गावकरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)