शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बालरोगतज्ज्ञाकडून लाखोंची वीजचोरी उघड

By admin | Updated: September 18, 2014 23:32 IST

महावितरण कंपनीकडून वीज चोरी करू नका, यासाठी वारंवार जनजागृती केली जात आहे. तरीही वीजचोरीचे प्रकार घडतच आहेत. आतात चंद्रपुरातील प्रतिष्ठित बालरोगतज्ज्ञ डॉ. एम.जे. खान यांच्या

चंद्रपूर : महावितरण कंपनीकडून वीज चोरी करू नका, यासाठी वारंवार जनजागृती केली जात आहे. तरीही वीजचोरीचे प्रकार घडतच आहेत. आतात चंद्रपुरातील प्रतिष्ठित बालरोगतज्ज्ञ डॉ. एम.जे. खान यांच्या दवाखान्यातच दोन लाख ६७ हजारांची वीज चोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या वीजचोरीत डास मारण्याच्या रॅकेटमध्ये रिमोट बसवून त्याद्वारे मीटरचे रिडींग कमी केले जात होते, हे विशेष.डॉ. खान यांचा येथील जिल्हा परिषदेसमोरच्या परिसरात मोठा दवाखाना आहे. रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्थाही या रुग्णालयात आहे. दरम्यान या दवाखान्यातून मागील अनेक दिवसांपासून वीज चोरी होत असल्याची शंका महावितरण कंपनीला आली. त्यांनी या मीटरचे सर्व रेकॉर्ड तपासून बघितले. महावितरणच्या चंद्रपूर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.व्ही. वाशिनकर व त्यांच्या पथकाने खान यांच्या दवाखान्यात जाऊन मीटरची तपासणी केली. त्यानंतर या दवाखान्यातून १८ हजार २५६ युनीट्सची वीज चोरी झाल्याची बाब उघडकीस आणली. या युनीटची किंमत दोन लाख ६७ हजार रुपये असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.उल्लेखनीय असे की ही वीज रिमोटच्या माध्यमातून मोठ्या शिताफीने केली जात होती. डास मारण्याची रॅकेटमध्ये एक छोटेखानी रिमोट बसविण्यात आला होता. या रिमोटने वाट्टेल तेव्हा मीटर रिडींग बंद करण्यात येत होती. याप्रकरणी महावितरण कंपनीने डॉ. खान यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत युनीटचे दोन लाख ६७ हजार व दंडाचे ४० हजार रुपये वसूल केले. सोबत रिमोट लावलेली ती रॅकेटसुध्दा जप्त करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)