शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

म्‍युकरमायकोसीसच्‍या रूग्‍णांसाठी खनिज विकास निधीतून खर्च उचलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:26 IST

चंद्रपूर : महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील सहा रूग्‍णालयात म्‍युकरमायकोसीस या आजारावर उपचार करता येत नाही. शासकीय ...

चंद्रपूर : महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील सहा रूग्‍णालयात म्‍युकरमायकोसीस या आजारावर उपचार करता येत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय तसेच सामान्‍य रूग्‍णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाहीत. अनेक रूग्‍ण खासगी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्‍य रूग्‍णांना परवडणारा नाही. त्‍यामुळे चंद्रपूर जिल्‍हयातील म्‍युकरमायकोसीस या आजाराच्‍या रूग्‍णांवर खनिज विकास निधी अंतर्गत पाच लाख रू. इतका खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

यासंदर्भात जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांना पाठविलेल्‍या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे की चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना महामारीच्‍या संकटात म्‍युकरमायकोसीस या आजाराचे संकट उदभवले आहे. या क्षणापर्यंत म्‍युकरमायकोसीसचे ५४ रूग्‍ण आपल्‍या जिल्‍हयात आढळले आहेत. त्‍यापैकी ३३ रूग्‍णांवर शस्‍त्रक्रिया झाल्‍या असून दुर्देवाने एकाचा मृत्‍यू झाला आहे. हा बुरशीजन्‍य आजार जीवघेणा असून अनेक रूग्‍णांना आपले डोळे, जबडा गमवावा लागतो व आयुष्‍यभर त्‍याची भरपाई होवू शकत नाही.

यासंदर्भात सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांच्‍याशी पाठपुरावा करून आम्‍ही सदर आजाराचा समावेश महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत करण्‍याचा निर्णय घ्‍यायला लावला. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयात सहा खासगी रूग्‍णालये आहेत. मात्र त्‍यापैकी एकाही रूग्‍णालयात म्‍युकरमायकोसीस या आजारावर उपचार करता येवू शकत नाही. सामान्‍य रूग्‍णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय येथे या आजारावर उपचारासाठी यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाही. अनेक रूग्‍ण खाजगी रूग्‍णालयांमध्‍ये उपचारार्थ दाखल हात आहेत. याठिकाणी प्रत्‍येक रूग्‍णावर पाच ते साडेपाच लक्ष रू. खर्च होतात. त्‍यामुळे रूग्‍णाच्‍या कुटूंबियांचे आर्थिकदृष्‍टया कंबरडे मोडत आहे, ते कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे हे संकट अधिक गडद होण्‍याआधी तातडीने खनिज विकास निधी अंतर्गत सदर रूग्‍णांसाठी पाच लक्ष रू. खर्च उचलण्‍याचा निर्णय घेण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.