शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

पाणीपुरवठा विभागाकडून फ्लोराइडयुक्त गाव बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST

घनश्याम नवघडे नागभीड : पाणीपुरवठा विभागाने आलेवाही या फ्लोराइडयुक्त गावाला पाणीपुरवठा योजनेपासून बेदखल केले आहे. पाच वर्षांपूर्वी या गावासाठी ...

घनश्याम नवघडे

नागभीड : पाणीपुरवठा विभागाने आलेवाही या फ्लोराइडयुक्त गावाला पाणीपुरवठा योजनेपासून बेदखल केले आहे. पाच वर्षांपूर्वी या गावासाठी पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर ती मंजुरीविना पडून आहे.

आलेवाही हे नागभीड तालुक्यातील शेवटचे गाव असून, अतिशय दुर्गम भागात आहे. गावाची लोकसंख्या ५००च्या आसपास आहे. गावाभोवती घनदाट जंगल आहे. सतत फ्लोराइडयुक्त पाणी प्यायल्याने या गावातील लोकांना विविध आजार जडले आहेत. म्हणूनच शासनानेही या गावाची फ्लोराइडयुक्त गाव अशीच नोंद केली आहे.

फ्लोराइडयुक्त पाण्यापासून या गावाची कायम मुक्तता व्हावी, यासाठी ५ वर्षांपूर्वी या गावासाठी २५ लाख रुपये किमतीची जलस्वराज्य या योजनेतून पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली. मात्र, गाव फ्लोराइडयुक्त असूनही या पाच वर्षांत पेयजल योजनेला मंजुरीच देण्यात आली नाही. गावची ग्रामपंचायत व सिंदेवाहीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दरवर्षी वरिष्ठ पातळीवर या योजनेचा पाठपुरावा करीत असले आणि गावही फ्लोराइडयुक्त असले, तरी आलेवाहीच्या या पेयजल योजनेस आजवर मंजुरी का मिळत नाही, हे एक कोडेच. प्रत्येकाला शुद्ध पाणी हे शासनाचे धोरण आहे. त्यातल्या त्यात फ्लोराइडयुक्त गावास प्राधान्य द्यावे, असा नियम आहे. मग आलेवाहीच्या पेयजल योजनेचे घोडे अडते कोठे, असा सवाल गावकरी करीत आहेत. दरम्यान जलस्वराज्य योजनेतून मंजुरी मिळत नसल्याने, सुधारित अंदाजपत्रक तयार करून राष्ट्रीय पेयजल योजनेतून योजना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, लोकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आलेवाही येथे एका हातपंपावर शुद्ध पाण्यासाठी आरो लावण्यात आला आहे. मात्र, हा आरो पुरेसा पाणी देण्यास असमर्थ आहे. अनेकदा तो बंद अवस्थेतच राहत असल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत तो बंदच आहे. दरम्यान, आलेवाहीचे ग्रामसेवक के.यू. वानखेडे यांना या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, सव्वा वर्षांपासून मी आलेवाहीचा ग्रामसेवक म्हणून काम पाहत आहे. तेव्हापासून पाणीपुरवठा योजनेसंदर्भात माझा पाठपुरावा सुरू आहे, पण अजूनही योजनेला मंजुरी मिळाली नाही.