शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

सर्वस्व हरविले; १३७ कुटुंब आभाळाखाली

By admin | Updated: May 31, 2014 23:21 IST

गडचांदूर: निसर्गाच्या प्रकोपाने गडचांदुरला आज शनिवारी जोरदार हादरा दिला. अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये काम करून आपल्या आयुष्याला आधार देवू पाहणार्‍या गरीबांचे संसार नियतीने आज चुटकीसरशी पायदळी तुडविले.

आशिष देरकर - गडचांदूरगडचांदूर: निसर्गाच्या प्रकोपाने गडचांदुरला आज शनिवारी जोरदार हादरा दिला. अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये काम करून आपल्या आयुष्याला आधार देवू पाहणार्‍या गरीबांचे संसार नियतीने आज चुटकीसरशी पायदळी तुडविले. तब्बल १३७ झोपड्यांना गिळून ही आग शमली असली तरी त्यानंतर सुरू झालेला गरीबांचा आक्रोश मात्र न थांबणारा आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीने अवघ्या काही वेळात सारी वस्ती आपल्या कवेत घेतली. आगीचा डोंब उसळला. नागरिक स्वत:चा जीव वाचवित मिळेल त्या वाटेने पळू लागले. महिला आपल्या चिल्यापिल्यांना घेवून घराबाहेर पडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत प्राणहाणी झाली नसली तरी वित्तहाणी मात्र मोठय़ा प्रमाणावर झाली. एकीकडे वस्तीने पेट घेतला असताना घरातील सिलिंडर वाचविण्यासाठी काही लोक शर्तीचे प्रयत्न करीत होते. तर काही लोक याचा गैरफायदा घेत हातात मिळेल ती वस्तू घेवून पळत होते. या संपूर्ण वस्तीत मजूरांची वास्तव्य आहे. घाम गाळून मिळविलेला पैसा आणि त्यातून तयार केलेले सोन्याचे दागिने या आगीत भस्मसात झाले. आयुष्याची पुंजी नियतीने हिरावली. त्याचे दु:ख काळजात घेवून या वस्तीतील माणसे आता सैरभैर झाली आहे. जगायचे कसे, राहायचे कुठे या यक्ष प्रश्नाने सारेच  हादरुन गेले आहे. आज दुपारपर्यंत जी वस्ती डौलात उभी होती. ती क्षणार्धात उद्ध्वस्त झाली.