शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीनंतरही 216 धनदांडग्यांनी थकविले 5 कोटी 58 लाखांचे वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

कोरोनाचा कहर सुरू असताना सर्व नागरिक रोजगार व्यवसायाअभावी घरीच होते. अडीच-तीन महिने संपूर्ण कुटुंब घरात  अडकून राहणे, ही घटना अत्यंत तापदायक होती. मात्र वीज कंपनीने ग्राहकांना अखंड वीज पुरवठा केला. परिणामी, नागरिकांना घरात सुरक्षितपणे राहणे सुकर होऊ शकले.  या काळात उद्योग व व्यवसायही बंद होते. अशा स्थितीत नियमित दर आकारणीनुसार वीज बिल भरणे अशक्यच ठरले असते.  

ठळक मुद्देमहावितरणला आर्थिक फटका : वसुलीसाठी वीज अधिकाऱ्यांची दमछाक

राजेश मडावी लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली. अनेकांचे व्यवसाय बुडाले. लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांचेही नुकसान झाले. अशा अत्यंत अस्वस्थ काळात वीज वितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवला.   त्यामुळे सामान्य ग्राहक स्वत:हून वीज बिल भरत आहेत. मात्र, बऱ्याच व्यवसायांची स्थिती पूर्वपदावर आली असताना एक लाखाहून जास्त रक्कम थकबाकी असलेल्या २१६ धनदांडग्यांनी बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे धनदांडग्यांकडील ५ कोटी ५८ लाख ९३ हजारांची वसुली करण्यासाठी महावितरणने नोटिसा बजावल्या आहेत.  कोरोनाचा कहर सुरू असताना सर्व नागरिक रोजगार व्यवसायाअभावी घरीच होते. अडीच-तीन महिने संपूर्ण कुटुंब घरात  अडकून राहणे, ही घटना अत्यंत तापदायक होती. मात्र वीज कंपनीने ग्राहकांना अखंड वीज पुरवठा केला. परिणामी, नागरिकांना घरात सुरक्षितपणे राहणे सुकर होऊ शकले.  या काळात उद्योग व व्यवसायही बंद होते. अशा स्थितीत नियमित दर आकारणीनुसार वीज बिल भरणे अशक्यच ठरले असते.  दरम्यान, वीज  बिल माफ होण्याच्या अफवाही पसरल्या. परंतु, कुठलीही वीज बिल माफी  मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. त्यामुळे  सामान्य ग्राहक वीज बिल भरू लागले तर दुसरीकडे इन्स्टॉलमेंट पॉलिसी योजना लागू करूनही धनदांडग्या ग्राहकांनी वीज बिलाकडे पाठ फिरविली.  आजमितीस २१६ श्रीमंत ग्राहकांकडे तब्बल ५ कोटी ५८ लाख ९३ हजारांचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे महावितरणपुढे वसुलीचे आव्हान ठाकले आहे. 

चंद्रपूर विभागात सर्वाधिक थकबाकीचंद्रपूर विभागासह व  मूल, सावली उपविभागात एक लाखाहून जास्त थकीत असलेल्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक १३२ आहे. बल्लारपूर विभागातील गडचांदूर, गोंडपिपरी, जिवती, पोंभुर्णा, राजुरा उपविभागात ३५, वरोरा विभागातील चिमूर, भद्रावती ४९ ग्राहकांकडे एक लाखाहून अधिक  वीज बिल थकीत आहे. या तीनही विभागाची एकूण थकबाकी ५ कोटी ५८ लाख ९३ हजार २२ रुपये एवढी आहे.

उद्योग व वाणिज्यिक ग्राहकांसाठी इन्स्टॉलमेंट पॉलिसी योजना लागू आहे. मात्र, ग्राहकांनी याचा लाभ घेतला नाही. त्यामुळे या श्रेणीतील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. व्यापक हित लक्षात घेऊन  थकीत बिल भरणा केला पाहिजे. अन्य ग्राहकांनी थकीत बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० चा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता, महावितरण चंद्रपूर मंडळ

थकबाकीत व्यावसायिक नंबर एकमहावितरणच्या बल्लारपूर विभागांतर्गत शहरातील १६ ग्राहकांकडे ४७ लाख ५८ हजार ६३३ हजारांची वीज थकबाकी आहे. राजुरा, गोंडपिपरी प्रत्येकी ३, गडचांदूर ७, जिवती २, चंद्रपूर विभागात चंद्रपूर शहर २२, चंद्रपूर २०. चंद्रपूर उपविभाग ८१, मूल ३, सावली ५, वरोरा विभागातील चिमूर १२, भद्रावती १० व वरोरा येथील २७ वीज ग्राहकांकडे एक लाखाहून जास्त रक्कम थकबाकी आहे.  हे सर्व ग्राहक   व्यावसायिक व वाणिज्यिक श्रेणीतील आहेत.  

टॅग्स :electricityवीज