शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या आगीचा पर्यावरणाला धोका

By admin | Updated: May 1, 2016 00:38 IST

महानगरपालिकेच्या वतीने येथील बल्लारपूर मार्गावरील डम्पींग यार्डवर शहरातील घनकचरा टाकला जातो.

महानगरपालिकेचे दुर्लक्ष : परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यातचंद्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने येथील बल्लारपूर मार्गावरील डम्पींग यार्डवर शहरातील घनकचरा टाकला जातो. या कचऱ्याला वारंवार आग लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला लागून असलेल्या अष्टभूजा वॉर्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटीने जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे.चंद्रपूर- बल्लारपूर वळण मार्गावर महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे. या घनकचरा प्रकल्पाला पूर्ण कंपाऊंड करण्यात आलेले नाही. परिणामी या कचऱ्यावर नेहमीच गायी, म्हशी, डुकरे, कुत्रे यांचा वावर असतो. त्यासोबतच बगळ्यांची (कॅटल इग्रेट) भटकंती येथे असते. या डम्पींग यार्डमधील काही पदार्थ हे प्राणी दूरवर नेत असतात. या परिसरात कुत्र्यांची संख्या मोठी आहे. कचरा डेपोच्या एका बाजूला शहर आणि दुसऱ्या बाजूने जंगल वेढलेले आहे. त्यामुळे बिबट्यासारखे प्राणी याकडे आकर्षित होतात. त्यामुळे भविष्यात या परिसरात मानव- वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.या कचरा डेपोच्या पूर्व भागात एका नाला आहे. तो कचरा डेपोला लागूनच वाहतो. अशा स्थितीत या कचरा डेपोतून तयार होणारा अत्यंत धोकादायक लिचाट या नाल्यातील पाण्यासोबत वाहत जाते. पुढे ते झरपट नदीतून रामाळा तलावापर्यंत येते. वास्तविक पाहता अशा कचरा डेपोतील पाण्याचा निचरा कुठेच होऊ नये, यासाठी विशेष ड्रेनेजची व्यवस्था केली पाहिजे. ती केली नाही. या भागाातील भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.तसेच या प्रकल्पात कचऱ्याचे विभक्तीकरण झालेले नाही. पुनर्वापर होऊ शकणारा कचरा, कंपोस्टेबल कचरा, बायोडिग्रेडेबल कचरा, घनकचरा, कॅटरर्सचे प्लास्टिक पदार्थ, हजार्डस, रासायनिक सेल, बॅटरीज अशा सर्व प्रकारच्या गोष्टी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ढिगाऱ्यात मिसळलेल्या असतात. ही बाब महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २००० चे मोठे उल्लंघन आहे, असा दावा ग्रीन प्लॅनेटने केला आहे. नियमाप्रमाणे या कचऱ्याचे पृथक्करण करावयास पाहिजे. प्रत्येक कचऱ्याला वेगवेगळ्या प्रक्रियेने नष्ट करावयास पाहिजे. परंतु असे कुठेच दिसून येत नाही. दररोजच्या कचऱ्यावर मातीचे थर टाकले जावे, असाही नियम आहे. मात्र यापैकी काहीच होत नाही.या कचरा डेपोच्या बल्लारपूर- बायपास रस्त्याकडून कुणालाही या कचरा डेपोत जाता येते. मागील बाजू उघडीच आहे. खरे तर नियमानुसार या प्रवेशद्वारावर एक सुरक्षारक्षक असावा. शहरातील केटरर्स या डेपोत वाचलेले जेवण, प्लास्टिक सतत टाकत असतात. खराब झालेल्या या जेवणातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. या कचरा डेपोतून अनेक दिवसांपासून धूर दिसत आहे. दररोजचा कचरा उघड्या वातावरणाच्या संपर्कात येणार नाही, यासाठी त्या कचऱ्यावर माती झाकून टाकावी, असे नगर विकास मंत्रालयाचे निर्देश आहेत. या निर्देशाचे पालन होताना दिसत नाही. सर्वत्र कचरा अगदी उघडा असतो. संपूर्ण कचरा डेपोत रस्त्याची निर्मिती करावी, जेणेकरुन कचरा एकाच ठिकाणी टाकला जाणार नाही, असेही निर्देश आहेत, या सर्वे निर्देशांची पायमल्ली होताना दिसून येते, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे निवेदनात म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)