शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित जमिनी नियमानुकूल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:22 IST

भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना देण्यात आलेल्या जमिनींच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याच्या प्रक्रियेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सिंधी समाजबांधवांच्या वसाहतीमध्ये भरपाई संकोष मालमत्तेमधून दिलेल्या....

ठळक मुद्देअर्थमंत्र्यांचा पुढाकार : सिंधी समाज बांधवांकडून मुनगंटीवारांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना देण्यात आलेल्या जमिनींच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याच्या प्रक्रियेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सिंधी समाजबांधवांच्या वसाहतीमध्ये भरपाई संकोष मालमत्तेमधून दिलेल्या अथवा अशा मालमत्तेवरील अतिक्रमण नियमानुकुल करून वर्ग-ब सत्ता प्रकाराने असे भुखंड दिल्याचे आढळल्यास पुनर्विलोकन करून अशा निवासी मिळकतीला वर्ग-अ नमूद करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.सिंधी समाज बांधवांच्या हिताचा सदर निर्णय घेतल्याबद्दल शनिवारी सिंधी समाज बांधवांच्या वतीने चंद्रपुरात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करीत आभार व्यक्त केले. तात्पुरत्या पट्टयावर दिलेल्या जमिनी मालकी हक्काने देणे तसेच त्यांना भाडे पट्टयाने दिलेल्या जमिनीसुध्दा मालकी हक्काने देणे या सिंधी समाज बांधवांच्या मागण्यांचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला आहे. विधानसभा सदस्य म्हणूनसुध्दा त्यांनी विधानसभागृहाच्या माध्यमातूृन या विषयाचा सतत पाठपुरावा केला आहे. ही प्रलंबित मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पुर्णत्वास आल्यामुळे सिंधी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिंधी पंचायत चंद्रपूरचे अध्यक्ष वल्लीराम टहलियानी, सचिव मेघराजमल पबनानी, परमानंद दुधानी, मुरली मंगाणी, राजकुमार लेखवाणी आदींच्या शिष्टमंडळांने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला.