शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहीनांची सबलीकरण योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: September 11, 2015 01:21 IST

दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, नवबौद्ध भूमीहीन कुटुंबाना उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन म्हणून जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ....

गुंजेवाही : दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, नवबौद्ध भूमीहीन कुटुंबाना उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन म्हणून जमीन उपलब्ध करून देण्यासाठी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजना शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली. मात्र शासनाकडे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यायला जमीन उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाला पेच पडला आहे. तर अनेक भूमीहीन या योजनेबद्दलच अनभिज्ञ असल्यामुळे ही योजना थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.हजारो भूमीहीन शेतमजुरांवर असलेला भूमीहीनचा डाग मिटविण्यासाठी शासनाने १ एप्रिल २००४ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेला सुरुवात केली. दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, नवबौद्ध, भूमीहीन शेतमजुर कुटूंबांना यापूर्वी उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन उपलब्ध नव्हते. त्यांना रोजगार हमी योजना अथवा खाजगी व्यक्तीकडे मजुरी करावी लागत असे. तेव्हा त्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळून त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, यासाठी दादासाहेब गायकवाड स्वाभीमान योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदान व ५० टक्के कर्ज या स्वरूपात निधी देण्याचा निर्णय घेऊन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती.या योजनेसाठी मोठी अडचण भासत असून ज्या शेतकऱ्यांकडून लाभार्थ्यांना जमीन देण्यासाठी शासन जमीन विकत घेतो, त्या जमिनीला योग्य भाव न देता शासकीय दराप्रमाणे भाव देत असल्यामुळे शेतकरी शासनाला जमीन विकत देत नाहीत. त्यामुळे शासनाजवळ जमीन उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या जास्त व शासना जवळ उपलब्ध जमीनीची संख्या कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत जमीन कुठून द्यायचे, असा पेच शासन, प्रशासनासमोर असून ही योजना थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)