शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी भ्रष्टाचार प्रकरणात आकडा फुगण्याची शक्यता

By admin | Updated: July 14, 2015 01:34 IST

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतअंतर्गत रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असून

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतअंतर्गत रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असून अजुनही आरोपीला अटक झाली नाही. या प्रकरणात भ्रष्टाचाराच्या रकमेचा आकडा फुगण्याची शक्यता आहे.रोजगार हमीच्या कामामध्ये रोजगारसेवक शशिकांत गिरडकर याने भ्रष्टाचार केल्याची ओरड होत असताना रोजगार हमीच्या कामामध्ये किती भ्रष्टाचार झाला यासाठी तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समितीकडून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये २ लाख चार हजार ९३५ रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रारकर्त्यांसह आतापर्यंत २३ लोकांचे बयाण घेण्यात आले असून १६ नागरिक बयाणासाठी चौकशी समितीसमोर हजर होऊ शकले नाहीत.जिल्हास्तरीय समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. यामध्ये अनियमितता, बोगस मजूर, रोजगारसेवकाने स्वत:चे खाते क्रमांक टाकून परस्पर रक्कम उचलणे असे प्रकार समोर आलेले आहे. संगीता गिरडकर यांच्या जॉबकार्डवर इतर खोटी नावे टाकून व स्वत:च्या खाते क्रमांक टाकून रोजगार सेवकाने ६०,८४२ रुपये उचलले. तसेच आकाश पोहनकर यांच्या जॉबकार्डवर इतर इंग्रजी-मराठी नावे टाकून व स्वत:चे खाते क्रमांक देऊन ७०,९८८ रुपये रोजगार सेवक शशिकांत गिरडकर यांनी एकुण १३१८३० रुपये स्वत:च्या नावानी उचलले तसेच काही मजूर कामावर न जाताही त्यांची हजेरी लावण्यात आली असून त्या-त्या व्यक्तीच्या खात्यावरील रक्कम परस्पर उचलली आहे. ती रक्कम आम्ही उचलली नाही, असे काहींनी सांगितले. परंतु ती रक्कम जॉबकार्डधारकांच्या खात्यातून उचलली असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. ही रक्कम नेमकी कुणी बँक खात्यातून काढली, हे गुलदस्त्यात आहे. परंतु सदर रक्कम ज्या-ज्या जॉबकार्डधारकांच्या खात्यातून उचलली आहे, त्यांच्याकडून वसूल करण्याची शिफारसही चौकशी समितीने केली आहे.चौकशी अहवालामध्ये आतापर्यंत २ लाख ४ हजार ९३५ रुपयांचा अपहार झाला असला तरी याबाबत अधिक चौकशी झाली तर आकडा फुगण्याची शक्यता असल्याने सदर ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून विशेष तपासणी करण्याची शिफारस चौकशी समितीकडून करण्यात आली आहे. (वार्ताहर)