शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

भेजगाव परिसरात विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:36 IST

मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहे. विद्युत कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने पुरवठा सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे नागरिकांना अंधरात दिवस काढवा लागतो.

ठळक मुद्देसंडे अँकर । नागरिकांना करावा लागतो अडचणींचा सामना, व्यावसायिकांनाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहे. विद्युत कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने पुरवठा सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे नागरिकांना अंधरात दिवस काढवा लागतो.भेजगाव परिसरात चिचाळामार्गे मूलवरुन विद्युत पुरवठा होतो. या परिसरात जवळपास २० गावे आहेत. मात्र मूल शिवाय कुठेही दुसरे विद्युत केंद्र नाही. सद्यास्थितीत पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. वातावरणात थोडातरी बदल झाल्यास विद्युत पुरवठा दिवसभरासाठी किंवा रात्रभरासाठी खंडित होतो. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. तरे विजेचे चालणारी व्यावसायिकांना मोठा फटका बसतो.अनेकदा विद्युत वितरण कंपणीच्या धोरणामुळे कमी दाबाचा विद्युत पुरवठा होतो. परिणामी घरघुती उपकरणे, कृषीपंप निकामी ठरत असल्याची बोंब शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यासोबतच व्यावसायिकांची झेराक्स मशिन, नेटकॅफेमधील संगणक, आटाचक्की, घरघुती उपकरणामध्ये बिघाड होत आहे. येथील विद्युत विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यांना विद्युत पुरवठ्याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे त्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, तसेच विद्युतपुरवठा नियमीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.३३ केव्ही उपकेंद्राची मागणीभेजगाव परिसरात मूलवरुन विद्युत पुरवठा करण्यात येतो. मात्र या परिसरात पुरेसा विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे अनेकांची उपकरणामध्ये बिघाड होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपात बिघाड होऊन मोठे आर्थिक नुकसना झाले आहे. भेजगाव हे मूल तालुक्यातील मध्यवर्ती केंद्रस्थान असल्याने या ठिकाणी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र सुरु करुन परिसरात विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. जर या परिसरात विद्युत उपकेंद्र झाल्यास परिसरातील नागरिकांना सोईचे होणार आहे. त्यामुळे भेजगाव येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र सुरु करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.मुख्यालयी राहण्याची सक्ती करावीसर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र भेजगाव परिसरातील विद्युत कर्मचारी मूलवरुन अपडाऊन करतात. परिणामी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर संबंधित कर्मचारी मूलवरुन येऊन दुरुस्ती करण्यापर्यंत वाट पहावी लागते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागते. त्यामुळे सर्व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.