शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 00:33 IST

ग्रामीण भागात नेहमी विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यावर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने कोशल्य विकास योजनेतंर्गत नुकतीच ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे.

अनेकांना मिळणार रोजगार : ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक’ योजनापरिमल डोहणे चंद्रपूरग्रामीण भागात नेहमी विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यावर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने कोशल्य विकास योजनेतंर्गत नुकतीच ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानूसार राज्यातील २३ हजार ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक असा विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबण्यास मदत होईल. ग्रामीण भागात कर्मचारी स्थानिक राहत नसल्यामुळे नेहमीच विजेचा लपंडाव सुरु असतो. बहुतेकदा तर दोन-दोन दिवस वीज येत नाही. परिणामी अनेक कामे खोळंबली जातात. त्यामुळे राज्य शासनानाने ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक उमेदवाराची निवड विद्युत व्यवस्थापक म्हणून करण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या योजनेतून अनेकांना रोजगारसुद्धा मिळणार आहे.विद्युत व्यवस्थापक म्हणून गावातील वीजतंत्री आयटीआय झालेला किंवा गावात विद्युतचे काम करणाऱ्या व्यक्तीला विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमण्यात येणार आहे. विद्युत व्यवस्थापकाकडे वीज दुरुस्ती करणे, वीज पुरवठा खंडीत करणे, फ्युज कॉल तक्रारीचे निवाकरण करणे, पथदिव्यांची देखभाल करणे, ब्रेकडाऊन अटेंड करणे, फ्यूज टाकणे आदी कामे विद्युत व्यवस्थापकाला करावी लागणार आहे. विद्युत व्यवस्थापकाला मानधन म्हणून प्रती कु टुंब नऊ रुपये याप्रमाणे रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार प्राप्त होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव एक गाव, एक ग्राम विद्युत योजनेमुळे थांबणार आहे. अनेक बेरोजगारांनामिळणार रोजगारएक गाव, एक विद्युत व्यवस्थापक या योजनेतंर्गत राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी विद्युत व्यवस्थापकांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये गावातील वीजतंत्री आयटीआय झालेला युवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे.