शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदाराचा ‘हाय होल्टेज शॉक’

By admin | Updated: November 22, 2014 22:59 IST

आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच जनता दरबारात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकार वृत्तीबाबत आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. सर्वाधिक तक्रारी

भद्रावती : आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच जनता दरबारात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकार वृत्तीबाबत आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी ‘हाय होल्टेज शॉक’ देत येत्या आठ दिवसात तक्रारींचे निराकरण करावे, असे खडसावले. आठवड्याभरात पुन्हा एक बैठक घेणार असल्याचे सांगत गावांमध्ये सुद्धा जनता दरबार भरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.जनतेच्या प्रलंबित समस्या व तक्रारी ऐकूण घेऊन त्या निकाली लावण्याच्या दृष्टीने आमदार बाळू धानोरकर यांनी नग परिषद सभागृह भद्रावती येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. तालुक्यातील विविध विभागातील एकूण ४४ तक्रारी याप्रसंगी प्राप्त झाल्या. वीज मंडळ, पंचायत समिती, एसटी महामंडळ, तहसील कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याशिवाय अन्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, दत्ता बोरीकर उपस्थित होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी दोन वर्षापूर्वी पैसे भरून अजुनही मीटर बसविण्यात आले नाही. ट्रान्सफार्मर जळाले तर लवकर वीज येत नाही. दोन महिन्यापासून मीटर बंद, विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, कामाबाबत अतिशय दिरंगाई याबाबतच्या अनेक तक्रारी उपस्थित नागरिकांनी याप्रसंगी केल्या. सर्वात जास्त तक्रारी वीज मंडळाच्या कारभाराबाबत होत्या. वीज मंडळाच्या कारभारात सर्वाधिक घोळ असून लवकरात लवकर तक्रारी निकालात काढण्याची तंबी आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. पोलीस पाटील, सरपंच यांना बोलावून त्यांना पंचायत समितीच्या योजना समजावून सांगा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तहसील कार्यालय व मल्हारीबाबा सोसायटी येथे बस थांब्याकरिता कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. याचा त्या क्षेत्रातील नागरिकांना लाभ मिळेल असे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)