शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उधारीवर भागविणार निवडणूक खर्च!

By admin | Updated: July 22, 2015 01:28 IST

जिल्ह्यात ४ आॅगस्ट रोजी ६२८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ४२ ग्राम पंचायतींमध्ये पोेटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे.

लोकमत विशेषंखर्च तीन कोटींचा शासनाने दिले एक कोटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खर्चाचा हिशेब जुळेना मंगेश भांडेकर चंद्रपूरजिल्ह्यात ४ आॅगस्ट रोजी ६२८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ४२ ग्राम पंचायतींमध्ये पोेटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. नामांकन अर्ज सादर झाले असून उमेदवारांकडून प्रचाराचा धडाकाही आता सुरू होणार आहे. मात्र ही निवडणूक प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाला निधीचा पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जवळपास ३ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र शासनाकडून केवळ १ कोटी ९ लाख रूपये आतापर्यंत प्राप्त झाले असून उर्वरित निधी लवकर न मिळाल्यास उधारीवरच निवडणूक खर्च भागविण्याची पाळी प्रशासनावर येणार आहे. कर्मचाऱ्यांना व ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी खासगी वाहने तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या केल्या जातात. मात्र राज्य परिवहन मंडळ नगदी पैसे भरल्याशिवाय बसगाड्या उपलब्ध करून देत नाही. तर खासगी वाहनांचे भाडेही नगदी स्वरूपात देण्याची पाळी येऊ शकते. निवडणुकीच्या कामासाठी शेकडो वाहनांची आवश्यकता भासणार असून यासाठी जवळपास १४ लाख रूपये खर्च येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे निवडणुकीसाठी तीन कोटी रूपये निधीची मागणी केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ७५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात ३४ लाख असे १ कोेटी ९ लाख रूपये प्रशासनाला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. उर्वरीत निधीही लवकरच उपलब्ध होईल, अशी अशा निवडणूक विभागाची आहे. मात्र शासनाकडून वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास नगदी खर्च करायचा तर कशावर, हा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने ४ जुलै रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाले. २० जुलै हा नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल १६ हजार उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. उमेदवारांच्या अर्जाची छाणणी करून अंतिम उमेदवार २३ जुलैला कळणार आहेत. ही सर्व प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून योग्यरित्या पार पाडली जात आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन पोहचविणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी व्यवस्था करण्यात जिल्हा निवडणूक विभाग व्यस्त आहे. मात्र शासनाकडून मिळालेल्या अपूऱ्या निधीमुळे नगदी खर्च करायचा तर कशावर, हा पेच निर्माण झाला आहे.कर्मचाऱ्यांच्या मानधनावर सव्वा कोटींचा खर्च ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जय्यत तयारी सुरू असून प्रत्येक कर्मचाऱ्याला निवडणूक मानधन म्हणून एक ते दीड हजार रूपये द्यावे लागणार आहे. म्हणजे १० हजार कर्मचाऱ्यांना मानधनापोटी सव्वा कोटी रूपये लागणार आहेत. बसगाड्यांचा खर्च १४ लाखनिवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचविणे व इतर साहित्याची ने-आण करण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसगाड्या व खासगी वाहने केली जाणार आहे. या वाहनांसाठी तब्बल १४ लाख रूपये खर्च येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांने दिली आहे.