शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत सव्वा कोटींची दारु जप्त

By admin | Updated: March 29, 2017 01:59 IST

चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी केल्यामुळे तळीराम शौक पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत.

चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी केल्यामुळे तळीराम शौक पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत. अवैध दारु विक्रीवर पोलिसांची करडी नजर असल्यामुळे दारू विक्रेतेही चांगलेच धास्तावले आहे. चिमूर पोलिसांनी अवघ्या आठ महिन्यात एक कोटी २२ लाख ३१ हजार ८६५ रुपयांच्या अवैध दारुसह मुद्देमाल जप्त केला आहे. चिमूर पोलीस स्टेशनमध्ये मागील काही वर्षापासून कोणताही ठाणेदार आपला कार्यकाळ पूर्ण करीत नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे अधिकारी चिमूरला येण्यास इच्छुक नसल्याचे विभागाकडूनच सांगण्यात येते. मात्र मागील वर्षाच्या जून महिन्यात चिमूर ठाण्याचा पदभार पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी ठाणेदार दिनेश लबडे यांच्याकडे सोपविला. ठाणेदार म्हणून पदभार स्विकारतानाच ठाणेदारांनी क्रांती नगरी चिमुरातील शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेत आपल्या कार्यास सुरुवात केली. मात्र ठाणेदारांनी शहराची शांतात भंग होण्याचे कारण अवैध दारू विक्री असल्याचे हेरुन अवैध दारुविरुद्ध मोहिम हाती घेतली. यात त्यांना चांगलेच यश आले आहे. पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या खून, चोरी, तंटे यासह अवैध दारुच्या गुन्ह्याचा छडा लावला. त्यामध्ये चिमूर पोलिसांनी अवघ्या आठ महिन्यात एक कोटी २२ लाख ३१ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन १६२ अवैध दारुचे गुन्हे दाखल करीत ३२२ आरोपींना अटक केली आहे. यामुळे भंडारा, नागपूर व मध्य प्रदेशातील अवैध दारु पुरवठ्यादारांनाही चांगलीच चपराक बसली आहे. त्यामुळे चिमुरातील दारु विक्रेते धास्तावले असल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षापासून नेताजी वॉर्डातील अवैध दारु विक्रेत्यांची चांगलीच दहशत होती. ती आता ओसरली असून शहरात अवैध दारु विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे. अवैध दारु विक्री प्रकरणात एक आरोपीस तडीपार करुन दोन आरोपींचे एसपीडीए काद्याअंतर्गत प्रस्ताव सादर केले आहेत. या अवैध दारु विक्री विरोधातील कारवाईमुळे नागरिक आनंदले आहेत. एकट्या चिमूर शहरात ४८ आरोपींना अटक चिमूर शहरात मागील अनेक वर्षापासून दारु विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या काही भागात चिमूर पोलिसांनी आठ महिन्यात धाड टाकून ३४ लाख ४८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ३५ गुन्ह्याची नोंद करुन ४८ आरोपींना अटक केली आहे.