शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्था येणार अडचणीत

By admin | Updated: December 27, 2014 01:19 IST

जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे समायोजन मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये रिक्त असलेल्या जागेवर करण्याचे शासनाचे आदेश आहे.

साईनाथ कुचनकार चंद्रपूरजिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे समायोजन मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये रिक्त असलेल्या जागेवर करण्याचे शासनाचे आदेश आहे. मात्र काही संस्था या शिक्षकांना सामावून घेण्यास तयार नाही. तर दुसरीकडे रिक्त असलेल्या जागेवर संस्था शिक्षकांना सामावून घेत नसेल तर प्रथम मुख्याध्यापकांचे वेतन अडविण्यात येणार आहे. त्यानंतर संस्थेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव उपसंचालकांकडे पाठविण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरु केली आहे. यामुळे शिक्षण संस्था आता अडचणीत येणार आहे.जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक आहे. या शिक्षकांना सामावून घेण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. शासन आदेशानुसार या विभागाने ज्या मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांचे पद रिक्त आहे. त्या संस्थांमध्ये अतिरिक्त शिक्षकांना पाठविणे सुरु केले आहे. शिक्षक तसे पत्र घेऊन संस्थांमध्ये जात आहे. मात्र शिक्षण संस्था या शिक्षकांना विविध कारण सांगून सामावून न घेता परत पाठवित आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी अवस्था झाली असून प्रश्न सुटण्याऐवजी आणखी चिघळत आहे. याबाबत शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. ज्या संस्था या शिक्षकांना रिक्त असलेल्या जागेवर सामावून घेणार नाही त्या शाळेतील मुख्याध्यापकांचे वेतन अडविण्यात येणार आहे. त्यानंतरही संस्था ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तर संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव उपसंचालकाकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या शिक्षकांना सामावून न घेतल्याप्रकरणी जिल्ह्यातील १७ शाळांतील रिक्त असलेले पद यापूर्वीच रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रिक्त पद असतानाही संस्था या शिक्षकांना सामावून घेण्याचे नाकारत असल्याने नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.