शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुण्यात शिक्षण

By admin | Updated: June 5, 2016 00:44 IST

गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

भारतीय जैन संघटनेचा उपक्रम : पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ चंद्रपूर : गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दरवर्षी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. ही सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यानुषंगाने भारतीय जैन संघटनेतर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त मुला-मुलींना पुणे येथे ५ ते १२ वीपर्यंत मोफत शिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.भारतीय जैन संघटनेने मागील वर्षी संपूर्ण मराठवाड्यातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ३०० मुला-मुलींना इयत्ता ५ ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी पुणे येथे आणले. येत्या शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातून १ जानेवारी २०१५ नंतर आत्महत्या केलेल्या ३,३०० शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी पुणे येथे आणण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. बीजेएसचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते त्या-त्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारामध्ये भेट देऊन त्यांच्या मुला-मुलींना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याची तयारी करून १३ जून रोजी आपआपल्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून रवाना करतील.चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत चंद्रपुरात ८६ तर गडचिरोली येथे ५ अशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आहेत. १ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ पर्यंत केंद्रीय नियोजन लोकांची समिती या समितीमध्ये चंद्रपुरातील व गडचिरोलीचे समन्वयक अशोक संघवी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समन्वयक समिती बनविली आहेत. त्यासाठी येथील दीपक पारख, महेंद्र मंडलेचा, रोहीत पुगलिया, जितेंद्र पाटनी, भूपेंद्र कोचर, तरूण बैद, अभिषेक कास्टीया या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १३ जूनला जैन भवन येथून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुणे येथे शिक्षणासाठी रवाना करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून याच दिवशी सर्व मुलांना पुणे येथे आणण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यात शासकीय सहकार्य लाभणार आहे. सन २०१५ मध्ये आपल्या जिल्ह्यातील विविध गावात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनामधील कुटुंबामध्ये अजून इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेली मुले आहेत का व त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेता येईल का, याची पाहणी प्रत्येक तालुक्यातील गावात जाऊन करण्यात येत आहे. यामध्ये आढळलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी सन २०१६-१७ या वर्षापासून संस्थेच्या वसतिगृहात आणि शाळेत मोफत प्रवेश देण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांपेक्षासुद्धा मानसिक, शारीरिक व शैक्षणिक प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्याच्या डोळ्यासमोर झालेल्या वडिलांच्या आत्महत्येचे दृश्य आयुष्यभर त्यांच्या समोर उभे राहणार आहे. त्यातून सावरून या मुलांना शिक्षण देऊन तयार करणे हे एक मोठे आव्हान आहे व बीजीएसने ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेंटल हेल्थ या वेगळ्या विभागाची स्थापना केली. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त संख्येने मुला-मुलींना शिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्याचे आवाहन ंसंस्थेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी केले आहे. (प्रतिनिधी)