शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीची धार आटली

By admin | Updated: April 21, 2016 01:14 IST

वरोरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार आटली आहे. त्यामुळे वरोरा शहर वासीयांना नदीचे शुध्द पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे.

वरोरावासींसमोर पाणी टंचाईचे संकट : नदीतील बंधारा ठरला कुचकामीवरोरा : वरोरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार आटली आहे. त्यामुळे वरोरा शहर वासीयांना नदीचे शुध्द पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे. पालिका प्रशासनाने एप्रिल महिन्यात पाणी अडविण्याकरिता तात्पुरता बंधारा बांधला. यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार न.प. प्रशासनाने चालविल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे.चालू वर्षीच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने एप्रिल, मे महिण्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार हे प्रारंभापासून सर्वत्र दिसून येत होते. त्यामुळे नदी, विहीरी, ट्युबवेल हातपंपमधील पाण्याची पातळी खोल जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असताना दरवर्षी नदीमध्ये बऱ्यापैकी पाणी असताना नदीच्या पात्रात वरोरा न.प. च्या वतीने तात्पुरता बंधारा बांधुन नदीतील पंपवेलजवळ पुरेसा पाणी साठा टिकवून ठेवण्यास मदत होत होती. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना नदीचे शुद्ध पाणी मिळत होते. परंतु, नदी पात्रातील हा तात्पुरता बंधारा नदीची धार आटल्यानंतर एप्रिल महिन्याच्या १७ तारखेला बांधण्यात आल्याने यामध्ये सध्यातरी पाणी अडेल किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. न.प. च्या पाणी पुरवठा विभागाने धरणातील पाणी आरक्षीत केले आहे. धरणातील पाणी सोडल्यानंतर या तात्पुरता बंधाऱ्यात पाणी अडेल असे मानले जात असले तरी धरणातून पाणी सोडल्यानंतर तुळाना घाटाजवळ पाणी येण्याकरिता आठ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)दर बुधवारी पाणीपुरवठा बंदनदीतून वरोरा शहरवासीयांना दररोज देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात यावेळी कपात करण्यात आली आहे. आठवड्यातील प्रत्येक बुधवारी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणातील पाणी न.प.ने आरक्षित केला असून वर्धा नदीची धार आटल्याने आरक्षित पाणी सोडण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहे.- पुरुषोत्तम खिरटकर, सभापती, पाणी पुरवठा विभाग, वरोरा