शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतीसोबतच आर्थिक सुबत्ता आणा

By admin | Updated: December 27, 2014 01:20 IST

येथे राजे खांडक्या बल्लारशाह राजाच्या समाधी परिसरात सुरु असलेल्या गोंड महासभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रम झाले.

बल्लारपूर : येथे राजे खांडक्या बल्लारशाह राजाच्या समाधी परिसरात सुरु असलेल्या गोंड महासभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भरगच्च कार्यक्रम झाले. विचारमंथन आणि परंपरागत रेला नृत्याने उपस्थितांचे मने जिंकली.गोंड समाजाच्या विविध समस्यांवर उपस्थितांनी प्रकाश टाकला. यात समाजाची होणारी पिळवणूक, आर्थिक मागासलेपणा याबाबतच चिंता व्यक्त करण्यात आली. हे दूर करायचे असल्यास आपली संस्कृती जपा, सोबतच आर्थिक सुबत्ता कशी येईल, याचा प्रयत्न करा, या मार्गाने जा असे मार्गदर्शन करण्यात आले. गोंडवाना गोंड पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा हिरासिंग मरकाम हे साहित्यावर भरभरून बोलले. सोबतच चुकीची माहिती देणाऱ्या साहित्यापासून आणि वक्त्यांपासून दूर राहावे, असा सल्लाही दिला. मरकान यांनी गोंडी इतिहास सांगत, आम्हाला मोठी परंपरा आहे. असे अभिमानाने सांगितले.गोंड समाजात स्त्रीचे महत्त्व याबाबत दुर्गावती पदमानकर, वेदमती मडावी यांनी विचार मांडले. गोंड शासकांनी प्रजाहितासोबतच त्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले असते तर आज गोंडी समाज पुढारलेला राहिला असता, अशी खंत व्यक्त करून युवकांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यातून प्रगती करून ही उणीव भरून काढावी, असा हितोपदेश वक्त्यांनी दिली. गोंडी लिपी व या भाषेला महत्त्व देऊन या भाषेचे जतन शासकीय स्तरावरून करण्यात यावे, अशीही मागणी काही वक्त्यांनी केली. आजच्या सभेत मोतीरावन कंगाली, खा. फग्गनसिह कुलस्ते, धर्मगुरु शेरसिग आचला, कुसूम आलाम, राजे विरेंद्रशहा आत्राम, दुर्गावती उईके, के.पी. प्रधान, के.पी.शहा, वासूदेव टेकाम, माजी आमदार नामदेव उसेंडी आदींनी विचार मांडले. बल्लारपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे समाजबांधवांनी गोंड संघटनेचे केंद्रस्थान बनवावे, असे विचार मांडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)