शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

जंगलाला वृक्षतोडीचे ग्रहण

By admin | Updated: June 5, 2014 23:53 IST

मध्यचांदा वनविकास महामंडळातील झरण, तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात प्रचंड वृक्षतोड झाली आहे. सन १३-१४ या वर्षात मोठय़ा प्रमाणात विविध क्षेत्रीय कामात गैरप्रकार करण्यात येत आहे.

मजुरांचेही शोषण : वनविकास महामंडळातील प्रकारकोठारी : मध्यचांदा वनविकास महामंडळातील झरण, तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात प्रचंड वृक्षतोड झाली आहे. सन १३-१४ या वर्षात मोठय़ा प्रमाणात विविध क्षेत्रीय कामात गैरप्रकार करण्यात येत आहे. महामंडळात आतापर्यंत झालेल्या विविध कामाची तसेच अवैध वृक्षतोडीची चौकशी करणे आता गरजेचे झाले  आहे. झरण वनपरिक्षेत्रात ८७५९.00३ हेक्टर जंगल क्षेत्र असून त्यात १0 बिट व पाच राऊंड आहेत. कन्हारगाव क्षेत्रात ९६९१.८२४ हेक्टर जंगल क्षेत्र असून त्यात १0 बिट व पाच राऊंड आहेत, तोहगाव वनक्षेत्रात ७ बिट व तीन राऊंड आहेत. त्यात ६५८९.0९१ हेक्टर जंगल आहे तर धाबा वनक्षेत्रात ६ बिट व तीन राऊंड असून ६१७४.६९४ हेक्टर जंगल आहे. महामंडळाच्या ३१२१४.६३२ हेक्टर जंगलात सागवान वृक्षासह अनेक प्रजातीचे मौल्यवान इमारती वृक्ष आहेत. या जंगलात वाघ, बिबट आदी प्राण्यांसह इतर वन्यप्राण्यांची संख्या भरपूर आहे. महाराष्ट्र शासनाने जंगलाचा विकास संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कोठारी, धाबा वनक्षेत्रातील ८0 टक्के जंगल महामंडळाच्या स्वाधिन केले. यात महामंडळाने २0-२२ हजार हेक्टर जंगलात रोपवन करुन करोडो रुपये खर्च केले आहे. मात्र सध्या वनप्रकल्पातील जंगलाला अवैध वृक्षतोडीचे ग्रहण लागले आहे. जंगल शेजारी गावातील चोरटे जंगलात बिनदिक्कतपणे कधीही प्रवेश करून मौल्यवान सागवानसह अनेक वृक्षांच्या कत्तली करीत आहेत. एकूण ३३ बिटातून १0-१५ बिटात अवैध वृक्षतोड प्रचंड  झाली आहे. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी कुठलेही प्रयत्न आजवर केले नाहीत. वनसंरक्षणाकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.  अवैध वृक्षतोड व चोरट्या वाहतुकीवर प्रतिबंध करण्याकरिता फिरते पथकाची निर्मिती असून त्यात एक आरएफओ व दोन कर्मचारी आहेत. त्यांना वाहनाची उलपलब्धता नाही. त्यामुळे ते केवळ घरी बसून जंगलाचे संरक्षण करतात. एकंदरीत वनविकास महामंडळ जंगल संरक्षणाकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. अवैध वृक्षतोडीची चौकशी वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍या व्यतिरिक्त इतर अधिकार्‍यांकडून केल्यास त्यातील सत्य समोर येईल. सन २0१२ ते २0१४ या आर्थिक वर्षात रोपवन तयार करण्याच्या नावावर अवैध कामे, गैरप्रकार अधिकार्‍यांच्या संमतीने केले जातात. रोपवन विरळण करणे, बिट, इमारती लाकूड कटाई करणे, वाहतूक करणे, जंगल डेपो तयार करणे, जंगल ते जंगल डेपो व जंगल डेपो ते विक्री डेपोपर्यंत रस्ता तयार करणे, वाहतूक करणे, रोपवनाची स्वच्छता करणे, जंगलात जाळरेषा तयार करणे, जलाई करणे, लांब बांबू, बांबु बंडल कटाई करणे आदी विविध कामे मजुराकडून केले जातात. यात शासनाने ठरविलेला मजुरांचा दर अधिकारी कधीही देत नाहीत. आपल्या मर्जीतील मजुरांना कामावर घेऊन इतरांना डावलण्यात येते. योग्य मजुरीची मागणी करणार्‍या मजुरांना कामावर कधीही घेतले जात नाही. वाहतुकदाराकडून योग्य कमीशनद्वारे कामे केली जातात. विक्री डेपोवर काम योग्य होत नाही. विक्री डेपोवर अनेक गैरप्रकार होत असतात. तसेच झरण येथे महामंडळाची रोपे तयार करण्याची नर्सरी आहे. या रोपवाटिकेत दररोज शेकडो मजूर काम करीत असतात. त्यात हजेरी बुकावर अनेक बनावट मजुरांचे नाव भरली जातात. सही- अंगठे बनावट मांडून लाखो रुपयांची उचल करण्यात येते. महामंडळाच्या विविध कामासाठी बनावट बिल तयार करण्यात येतात. बनावट व्हावचर तयार करण्यात येतात. वरिष्ठांचेही याकडे लक्ष नाही, हे विशेष. (वार्ताहर)