शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गुड खा; सोबतच ‘गुड’ शब्दांचाही वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:19 IST

भारत हा उत्सवाचा देश आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाज हा हम साथ साथ है म्हणत एकमेकांसाठी जगण्याचा संकल्प करतो. ...

ठळक मुद्देमकरसंक्रांतीनिमित्त पालकमंत्र्यांचा संदेश

भारत हा उत्सवाचा देश आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाज हा हम साथ साथ है म्हणत एकमेकांसाठी जगण्याचा संकल्प करतो. आनंद वाटण्याचा संकल्प करतो. या माध्यमातून एक परिवार दुसऱ्या परिवाराशी, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी तीन गुळ घ्या, गोड गोड बोला अशी शुभकामना करतो. आयुष्य शेवटी काय आहे? आयुष्य तीन पानांचं पुस्तक. जन्म, मृत्यू आणि कर्म. जन्म, मृत्यू ही दोन पाने तर आपल्या हातात नाही. तिसरे पान कर्म. मग जर आपण या कर्माच्या पानावर या मकरसंक्रांतीच्या उत्सवाच्या निमित्ताने जीवन गोड व्हावे म्हणून गोड शब्दाचा उपयोग करण्याचा संकल्प करीत असू, तर तीच खरी मकरसंक्रात आहे, असे विचार राज्याचे अर्थ व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.मकरसंक्रांत या सणाचा अर्थ म्हणजे केवळ गुड खाणे नाही. तर गुड शब्दाचा उपयोग करून कुणाचेही मन दुखावणार नाही. कोणत्याही व्यक्तीला आपल्या वाणीमुळे दु:ख होणार नाही, याची काळजी घेणे म्हणजेच मकरसंक्रांत. म्हणून प्रत्येकाने गोड शब्दाचा उपयोग करून समाजमनाचे हित जोपासत राहावे, असेही ना. मुनगंटीवार यांनी मनोगतात सांगितले.मनातील राग, मत्सर दूर करून नातेसंबंधात गोडवा निर्माण करणारा सण. प्रत्येकांनी गोड आणि गुड बोलावे. सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने आपसात गोडवा वाढवावा. हा गोडवा विकासाची नाळ थेट जनतेशी जुळविणारा असू शकतो, असा गोड संदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.