शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

खदानीतील स्फोटाने दगड उडतात शेतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:12 IST

वेकोलिचा गोवरी खुल्या कोळसा खाणीत कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत आहे. त्या शक्तीशाली स्फोटांनी ‘डेंजरझोन’ परिसरापलिकडेही कोळसा खाणीतील दगड थेट शेतात येउन उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारासंह परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार - पाच दिवसांपासून हा प्रकार घडत असल्याने परिसरातील नागरिक चांगलेच हादरले आहे.

ठळक मुद्देगोवरी खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टिंग : कामगारांसह नागरिकांच्या जीवाला धोका

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलिचा गोवरी खुल्या कोळसा खाणीत कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत आहे. त्या शक्तीशाली स्फोटांनी ‘डेंजरझोन’ परिसरापलिकडेही कोळसा खाणीतील दगड थेट शेतात येउन उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारासंह परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार - पाच दिवसांपासून हा प्रकार घडत असल्याने परिसरातील नागरिक चांगलेच हादरले आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत वेकोलिची गोवरी खुली कोळस खदान आहे. कोळसा उत्खननासाठी या कोळसा खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टिंग केली जाते. वेकोलि परिसराला अगदी लागून शेतकºयांची शेती आहे. गोवरी येथील शेतकरी विलास वाघमारे व संजय पिंपळकर यांची शेती कोळसा खाण परिसरात आहे. गेल्या चार - पाच दिवसांपासून खदानीत केलेल्या ब्लास्टिंगचे दगड थेट शेतात उडत आहे. कोळसा खाण शेतापासून दूर असूनही ब्लास्टिंगचे दगड शेतात येत आहे. स्फोटांनी दगड इतके वेगात येतात की दगड पडलेल्या जागेवर खड्डा तयार होतो. कोळसा खाणीत एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्तीशाली ब्लास्टिंग होत असताना येथील वेकोलिचे जबाबदार अधिकारी अनभिज्ञ कसे? हा धक्कादायक प्रकार वेकोलि अधिकाºयांचा लक्षात का आला नाही, असे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.विलास वाघमारे, संजय पिंपळकर यांची शेती वेकोलिच्या डेंजरझोन परिसराबाहेर असूनही कोळसा खाणीतील ब्लास्टिंगचे दगड शेतशिवारात येत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे.याकडे सब एरिया, खाण प्रबंधक वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. वेकोलित एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्तीशाली ब्लाटिसंग करण्यात येत असल्याने गोवरी येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. वेकोलि प्रशासनाने कोळसा खाणीतील ब्लास्टिंगची तीव्रता वाढविल्याने कोळसा खाणीतून ब्लास्टिंगचे दगड शेतात उडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे जिविताला धोका निर्माण झाला आहे. यावर वेकोलि प्रशासनाने तत्काळ प्रतिबंध घालावे, अशी मागणी गोवरीवासीयांनी केली आहे.