शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

साधनाताईंच्या स्मृतीदिनानिमित्त वृक्षदींडी

By admin | Updated: July 10, 2014 23:32 IST

साधनाताई आमटे यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त गुरूवारी आनंदवनात वृक्षदिंंडीचे आयोजन करण्यात आले. आजच्या दिवशी आनंदवनात १०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला.

वरोरा : साधनाताई आमटे यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त गुरूवारी आनंदवनात वृक्षदिंंडीचे आयोजन करण्यात आले. आजच्या दिवशी आनंदवनात १०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षदिंडीत आबालवृद्ध सहभागी झाले होते. आजच्या वृक्षदिंडीने १९७६ मध्ये काढण्यात आलेल्या पहिल्या वृक्षदींडीचा आठवणी ताज्या झाल्या होत्या.आनंदवनातील गोकूळ सभागृहाजवळ आज आनंदवनातील नागरिक, आनंद निकेतन महाविद्यालय, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन कृषी तंत्रनिकेतन, आनंदवन मूक बधीर, अंध, अपंग विद्यालयातील विद्यार्थी आनंदवनातील सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. भजन मंडळीही वृक्षदिंडीत सहभागी झाली होती. वृक्षदिंडी आनंदवनातील तलावानजीकच्या मार्गाने अभारण्य व श्रद्धावनजवळ पोहचली. डॉ. भारती आमटे व स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलाकारांनी ‘श्रृखंला पायी असू दे..., माणुस माझे नाव, पाहूना गोजीरवाना’ आदी एका पेक्षा एक सरस गिते सादर केली. कर्मयोगी बाबा आमटे यांचे शताब्दी वर्ष असल्याने १०० वृक्ष लावण्याचा संकल्प जाहिर करण्यात आला. वृक्षदिंडीची सुरूवात १९७६ ला बाबा आमटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण परिसरात वृक्षदिंडी हा शब्दप्रयोग सुरू झाला. प्रत्येकाने वृक्ष लावण्याचा संकल्प करा, प्रेत जाळल्याने प्रदूषणाचा धोका होतो. त्यामुळे प्रेत खड्डयात पुरुन त्यावर रोपटे लावावे, असे आवाहन सचिव डॉ. विकास आमटे यांनी या प्रसंगी केले. आजची वृक्ष दिंडीची संंकल्पना आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या संकल्पनेतून साकारली याचा उल्लेखही याप्रसंंगी डॉ. आमटे यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)