शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

रासायनिक खतांच्या वापराने पहाडावरील जमिनी होताहेत पडीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 13:10 IST

Chandrapur : सेंद्रिय शेती काळाची गरज, अन्यथा शेती फक्त नावापुरतीच राहील शिल्लक

दीपक साबणे लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. पहाडावरील शेतकरीवर्ग शेतीचे उत्पन्न वाढविण्याच्या नादात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असून सोबतच रासायनिक खते, कीटकनाशकांचाही वापर मोठ्या प्रमाणात करायला लागले आहेत. यामुळे दिवसेंदिवस जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होऊन जमिनीचा दर्जा घसरत आहे आणि जमीन दिवसेंदिवस बंजर होत आहे.

याचा परिणाम थेट शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनावर होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशक यांच्या वापरामुळे पिकाचा दर्जाही खालावत आहे. म्हणून आता पुन्हा सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज निर्माण झाली आहे. 

मागील दहा वर्षांपूर्वी माणिकगड पहाडावरील शेतकरी शेती व्यवसायासोबत पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहत होते. पशुपालनात गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी पाळत होते व दुग्धव्यवसायही करत होते. पशुपालन करत असल्यामुळे जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्व मिळत होते. यामुळे जमिनीचा दर्जा वाढत होता. कोणतीही हानी होत नव्हती. शिवाय शेतकऱ्यांना निरोगी पिकातून पौष्टिक अन्न मिळत होते. तसेच उत्पादन दर्जात वाढ ही होत होती. 

खरीप आणि रब्बी हंगामात पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तर शेतकरी स्वतः उपाययोजना करीत होते. मात्र, आजघडीला ही पद्धत अपवादात्मक शेतकरी अवलंबत आहेत. आजघडीला परिस्थिती बदलली आहे. पिकाचे उत्पादन चांगले व्हावे व पीक चांगले राहावे म्हणून रासायनिक खत व कीटकनाशके यांचा बेसुमार वापर होत असल्याने परिणामी जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्व नष्ट होत चालले आहेत. शेतीतून मिळणाऱ्या अन्नातही पोषण तत्त्वांचे प्रमाण अतिशय कमी दिसून येते. सध्या पिकांना रासायनिक खत व कीटकनाशके यांचा सर्रास वापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वेळीच भविष्याचा होणारा धोका ओळखून सेंद्रिय शेती करणे काळाची गरज बनली आहे. यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर फक्त उत्पादनवाढ डोळ्ळ्यासमोर ठेवून शेतकरी रासायनिक खत व कीटकनाशके यांचा बेसुमार वापर करत आहेत. परिणामी जमिनीतील पोषक तत्त्वे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळले नाहीत तर शेती फक्त नावापुरतीच शिल्लक राहील.

टॅग्स :FertilizerखतेAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर