शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची आबाळ

By admin | Updated: July 10, 2015 01:29 IST

निसर्गाच्या दृष्टचक्रात सतत पिचणारा बळीराजा यंदाही हवालदिल झाला आहे. पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली.

दुष्काळाचे सावट : उष्णतेमुळे पीक करपलेघोसरी: निसर्गाच्या दृष्टचक्रात सतत पिचणारा बळीराजा यंदाही हवालदिल झाला आहे. पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे उष्णतेत वाढ झाली. यामुळे अंकूरलेले बियाणे जमिनीतच करपत आहेत. दुबार पेरणीच्या अस्मानी संकटात शेतकऱ्यांना पावसाची सुतराम शक्यता दिसत नसून कोरड्या दुष्काळाची गडद छाया आवासून उभी आहे. निसर्गाचे दृष्टचक शेतकऱ्यांच्या पाचविला पूजलेले आहे. दरवर्षी या ना त्या कारणाने नापिकीचा सामना करावा लागेत आहे. मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने घोसरी- नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. परंतु नंतर पावसाने दडी मारल्याने बियाणे व धान पऱ्हे करपून उद्ध्वस्त होत आहेत.सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बळीराजा सावरण्यात केविलवाणी धडपड करीत दुबार पेरणीकरिता बियाणीची जुळवा-जुळव करुन कर्ज शिरावर घेतलेले आहे. परंतु पावसाने दीर्घ विश्रांती घेतलेली आहे. नित्यनेमाने मेघ दाटून येत असल्याने शेतकरी, चातकासारखी नभाकडे बघत आहे. परंतु निसर्ग कोपलेला आहे. परिसरात मुख्यत्वे धान पिकासह सोयाबिन, कापूस यांची पेरणी केलेली आहे. परंतु पावसाने दगा दिला असल्याने धान पिके धोक्यात आली आहे. दुबार पेरणीची सोय नसल्याने कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली असल्याने शेतकरी हतबल दिसत आहे. (वार्ताहर)