शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

शक्तिशाली ब्लास्टिंगमुळे गोवरीवासीयांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:16 IST

गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. दररोज गावकऱ्यांच्या ह्दयात थरकाप उडविणारे वेकोलितील ब्लास्टिंगचे आवाज तर कधी भूकंपासारखे बसणारे शक्तीशाली ब्लास्टिंगच्या धक्क्याने येथील नागरिकांचे आयुष्यच हादरले आहे. वेकोलि प्रशासनाची मुजोरी याला कारणीभूत असून गावकऱ्यांच्या नशिबात वेकोलिने हा संघर्ष मुद्दाम लादला आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांच्या वाट्याला संघर्षच : वेकोलि प्रशासनाची मुजोरी कायम, अनेक घरांना तडे

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. दररोज गावकऱ्यांच्या ह्दयात थरकाप उडविणारे वेकोलितील ब्लास्टिंगचे आवाज तर कधी भूकंपासारखे बसणारे शक्तीशाली ब्लास्टिंगच्या धक्क्याने येथील नागरिकांचे आयुष्यच हादरले आहे. वेकोलि प्रशासनाची मुजोरी याला कारणीभूत असून गावकऱ्यांच्या नशिबात वेकोलिने हा संघर्ष मुद्दाम लादला आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे जेमतेम चार हजार लोकसंख्येचे दाट लोकवस्ती असलेले गाव. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या गावाचा राजकारण, समाजकारण, लोकचळवळीत नेहमीच सहभाग राहिला आहे. गोवरी परिसरात मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचे साठे उपलब्ध असल्याने ३० वर्षांपूर्वी वेकोलिने या परिसरात कोळशाच्या खाणी सुरू केल्या. परिसरात मुबलक कोळसा उपलब्ध असल्याने वेकोलिने अगदी गावापासूनच जमीन अधिग्रहण करून घेतली. त्यामुळे वेकोलि प्रशासनाने गावालगतच कोळसा खदानीची निर्मिती करून घेतली. गावालगत असलेल्या गोवरी कोळसा खाणीत दररोज कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग केली जाते. वेळी-अवेळी केल्या जाणाºया शक्तिशाली ब्लास्टिंगने आता गोवरीवासीयांचे आयुष्यच हादरले आहे.महिनाभरापूर्वी गोवरी येथील बंडूजी भुसे यांच्या घराच्या स्लॅबची सिलिंग कोसळली. सुदैवाने यात अख्खे कुटुंबच बचावले. शक्तिशाली ब्लास्टिंगने शिवाजी हायस्कूल शाळेची बोअरवेल तीन फुट आतमध्ये गेली. गोवरी येथील अनेक घरांना ब्लास्टिंगने मोठ्या प्रमाणात तडे गेले आहे. त्यामुळे अशा घरात वास्तव्य करणे गावकºयांना आता धोक्याचे वाटू लागले आहे. वेकोलिचे दुष्परिणाम गोवरीवासीयांना नेहमीच सहन करावे लागले आहे. गोवरीवासीयांनी वेकोलिला अनेकदा निवेदन देऊन गावकऱ्यांचे होणारे हाल टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे सूचविले. मात्र मुजोर वेकोलि प्रशासनाने अनेकदा गावकऱ्यांची मुस्कटदाबी केली. हे वास्तव आहे. गावकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याचे सौजन्य वेकोलि प्रशासनाने कधी दाखविले नाही. केवळ वेळकाढू धोरण अवलंबून अनेकदा वेकोलिने गावकऱ्यांची मनसमजावणी केली. मात्र वेकोलिचे भोग आता गावकऱ्यांच्या नशिबी चिकटल्याने गावकरीही हतबल आहे. वेकोलिने गावकऱ्यांच्या जगण्यामरण्याचा संघर्षच सुरू केला आहे. मात्र जनसामान्यांचे लोकप्रतिनिधी वेकोलि विरोधात आवाज उठवायला तयार नाही. ही शोकांतिका आहे. गावकऱ्यांच्या पाठीशी कुणीही भक्कमपणे उभे राहायला तयार नाही.वेकोलिची ब्लास्टिंग नाहीच : अधिकाऱ्यांचा जावईशोधवेकोलित मोठ्या प्रमाणात शक्तिशाली ब्लास्टिंग केली जाते. त्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने वेकोलि अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आमच्या ब्लास्टिंगची तीव्रता अगदी कमी आहे. त्यामुळे ब्लास्टिंगचा हादरा गोवरी गावापर्यंत पोहचू शकत नाही. ही ब्लास्टिंग आमच्या खदानीची नाहीच, असा जावईशोध लावून वेकोलि अधिकाऱ्यांनी हात वर केले आहे.वेकोलिचे दुष्परिणाम गोवरीवासीयांना नेहमीच सहन करावे लागले आहे. परंतु वेकोलिने गावकऱ्यांच्या हितासाठी अजून कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे वेकोलि प्रशासनाने आता गावकऱ्यांच्या समस्या सोडविणे आवश्यक आहे.- सुनील उरकुडे, जि.प. सदस्य.वेकोलित केल्या जात असलेल्या ब्लास्टिंगची तिव्रता अगदी कमी आहे. त्यामुळे ब्लास्टिंगचा त्रास गावकऱ्यांना होणार नाही. याची खबरदारी आम्ही घेतली आहे.- ए. के. दीक्षित, सब एरिया मॅनेजर, गोवरी ओपनकास्ट.