शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येमुळे बामणी शासकीय निधीपासून वंचित

By admin | Updated: May 17, 2017 00:40 IST

तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची लोकसंख्या सहा हजारावर आहे. यामध्ये बामणीसह दुधोली, केमतुकूम व केमरितचा समावेश आहे.

तहसीलदारांना निवेदन : प्रशासनाचा गलथान कारभारलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची लोकसंख्या सहा हजारावर आहे. यामध्ये बामणीसह दुधोली, केमतुकूम व केमरितचा समावेश आहे. मात्र महसूल प्रशासनाने बामणी व दुधोली एकच गाव असताना वेगवेगळी दोन गावे दर्शविली आहे. परिणामी लोकसंख्येच्या आधारावर गाव विकासाठी मिळणाऱ्या निधीपासून बामणी (दुधोली) ग्रामपंचायत वंचित झाली आहे. याला प्रशासनातील गचाळपणा कारणीभूत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी केला. यावर तोडगा काढण्यात यावा म्हणून येथील नायब तहसीलदार रमेश कुळसंगे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची जनगणना सन २०११ मध्ये करण्यात आली. या दरम्यान लोकसंख्या नोंदविताना बामणी व दुधोली अशी दोन गावे दर्शवुन लोकसंख्या कमी करण्यात आली. याचा परिणाम असा झाला की जनसुविधा योजनांतर्गत विकास कामासाठी मिळणारा निधी लोकसंख्येच्या कमतरतेमुळे मिळू शकला नाही. बल्लारपूर तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायत महत्वपूर्ण असून विकासापासून वंचित आहे. विशेष म्हणजे, सदर दोन्ही गावे एकच असून सर्व महसुली दस्ताऐवज बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीच्या नावे नोंदविले आहेत. केवळ जनगणनेच्या आधारावर लोकसंख्या कमी करण्याचे काम करण्यात आले. सदर बाब गाव विकासाला खिळ बसवणारी ठरली आहे, असेही निवेदनातून जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी म्हटले आहे.बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची लोकसंख्या आजघडीला सहा हजारावर आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मिळणाऱ्या शासकीय अनुदान मिळण्यास पात्र असताना केवळ लोकसंख्या वेगळी दर्शविल्यामुळे विकास कामासाठी लाखोंचा निधी मिळत नाही. यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीला दूर ठेवण्याचे कारस्थान प्रशासनाने रचले आहे, असा गंभीर आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष ताजने यांनीही केला आहे.यावर तोडगा काढण्यात यावा. बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची योग्य लोकसंख्या ठरवून तसे प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपविभागीय अधिकारी शाहुराज मोरे, तहसीलदार विकास अहीर व संवर्ग विकास अधिकारी भुंजगराव गजभे यांना जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी निवेदन देवून न्यायाची मागणी केली आहे.