शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक यंत्रामुळे शेतमजुरांची उपासमार

By admin | Updated: January 10, 2015 22:52 IST

धान मळणी यंत्रानंतर आता कृषी क्षेत्रात धान कटाई यंत्राने प्रवेश केला आहे. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ही क्रांती असली तरी यामुळे ग्रामीण परिसरातील हजारो शेतमजूर मजुरीपासून वंचित झाले आहेत.

सिंदेवाही : धान मळणी यंत्रानंतर आता कृषी क्षेत्रात धान कटाई यंत्राने प्रवेश केला आहे. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ही क्रांती असली तरी यामुळे ग्रामीण परिसरातील हजारो शेतमजूर मजुरीपासून वंचित झाले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सिंदेवाही तालुक्यात खरीप हंगामात १८ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. या पिकावर ग्रामीण परिसराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. धानाच्या पेरणीपासून तर मळणीपर्यंत जवळपास चार महिन्याच्या कालावधी लागतो. या चार महिन्याच्या कालावधीत रोवणी, निंदण, कापणी आणि मळणी हे महत्त्वाचे टप्पे आहेत. या कालावधीत प्रत्येक गावातील जवळपास ७५ टक्के मजूर व महिला मजूर धान शेतीच्या कामात व्यस्त असतात. पण गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात ट्रॅक्टरने प्रवेश केल्याने ग्रामीण परिसरातील हजारो शेतमजुरांना फटका बसला होता.ग्रामीण परिसरात धान कटाई मुख्यत्त्वे महिला करीत असतात. ही धान कटाई करण्यासाठी गावातील १० ते १२ महिलांचा गट तयार करतात. एका गावात असे सहा-सात महिला गट असतात. एकरी आठ कुडव भावाने ही धान कटाई होत असते. एक ते दीड महिने चालणाऱ्या हंगामात एका महिलेची चार ते पाच खंडी (आठ क्विंटल) धानाची कमाई होते. ही कमाई एका कुटुंबासह वर्षभर पुरेल एवढी असते. धान मळणी यंत्र आल्यानंतर शेतकऱ्यांनी बैलबंडीच्या धान मळणीला पूर्णपणे तिलांजली दिली आहे. त्याचप्रमाणे गंजी बांधणीची पद्धतसुद्धा धान कापणी प्रमाणेच आहे. गंजी बांधणीमध्ये १० ते १२ शेतमजूर पुरुषाचा गट असतो. दोन एकर जमिनीला एक खंडी धान किंवा १ हजार ५०० रुपये एकराप्रमाणे रोखीने गंजी बांधणी करण्याची पद्धत आहे. धान कापणी लवकर होते म्हणून ‘गुत्ता’ पद्धतीच्या धान कापणीला तिलांजली देण्याची भिती व्यक्त होत आहे. या प्रकाराने तालुक्यातील अनेक गावांतील शेकडो मजूर दीड ते दोन महिने रोजगारापासून वंचित राहण्याची पाळी आली आसहे. याचा फटका सिंदेवाही तालुक्यातील हजारो शेतमजुरांना बसला आहे. (तालुका प्रतिनिधी)