शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

लक्कडकोट येथे उपचाराअभावी ४० ते ५० बकऱ्या दगावल्या

By admin | Updated: August 26, 2016 00:53 IST

महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील लक्कडकोट परिसरातील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर पावसाळ्यातील साथरोगाचा प्रादूर्भाव

शेतकऱ्यांचे नुकसान : डॉक्टर मुख्यालयी राहत नाहीतसास्ती : महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील लक्कडकोट परिसरातील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर पावसाळ्यातील साथरोगाचा प्रादूर्भाव झाल्यामुळे व त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने ४० ते ५० बकऱ्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील लक्कडकोट परिसरात जंगली भाग असल्यामुळे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुधन पाळतात. त्यात शेळ्या मेंढ्यांसह इतर जनावरांचा समावेश आहे. शासनही विविध योजना राबविते. परंतु या योजनांची योग्य अमलबजावणी होत नसल्यामुळे या योजना निरर्थक ठरत असल्याचे या परिसरात दिसून येत आहे.मागील महिन्याभरात अनेक दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे परिसरातील बकऱ्यांवर अज्ञात रोगाचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे शेकडो बकऱ्या आजारी पडल्या. परंतु या आजारी पडलेल्या बकऱ्यांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यातील ४०-५० बकऱ्या उपचाराअभावी दगावल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लक्कडकोट येथे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. परंतु येथील पशुधन पर्यवेक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे वेळीच उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. येथील मलय्या नानवेनवार यांच्या १५, सतय्या नानवेनवार यांच्या ७, लक्ष्मण झाडे यांच्या ६, संजय दुर्गे यांच्या तीन, प्रशांत झाडे यांच्या तीन, यासह इतर शेतकऱ्यांच्या अशा एकूण ४० ते ५० बकऱ्या दगावल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)लक्कडकोट येथे जनावरांचा दवाखाना आहे. परंतु या ठिकाणी डॉक्टर रहात नसल्यामुळे व औषधी व इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे आमची जनावरे मरत आहे.-लक्ष्मण झाडे, शेतकरी, लक्कडकोटतहसीलदारांनी घेतली दखलपरिसरातील गावभेटी करीता राजुरा येथील तहसीलदार लक्कडकोट परिसरात गेले असता, त्याच्या समोर ही घटना उघड झाली. शेतकऱ्यांनी उपचाराअभावी बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगताच तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र लिहून लक्कडकोट येथील बकऱ्यांच्या साथरोगावर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू पाठवून तपासणी करण्याची व मुख्यालयी न राहणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.