शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याच्या गैरहजेरीने कोठारीतील शेतकरी त्रस्त

By admin | Updated: September 8, 2014 01:11 IST

मागील चार महिन्यांपासून कोठारी येथील तलाठी कार्यालयात सतत अनुपस्थित राहात असल्याने कोठारीतील शेतकरी ...

कोठारी : मागील चार महिन्यांपासून कोठारी येथील तलाठी कार्यालयात सतत अनुपस्थित राहात असल्याने कोठारीतील शेतकरी व सामान्य नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.१२ हजार लोकसंख्या असलेल्या कोठारी गावात चार महिन्यांपासून तलाठी गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांना सातबारा, उत्पन्नाचे दाखले, नमुना आठ-अ आदि दाखल्यांसाठी तसेच शेती कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी शेतकऱ्यांना कार्यालयासमोर सतत तलाठ्याची वाट पाहत राहावे लागत आहे. पटवाऱ्याची चातकाप्रमाणे वाट पाहूनही तो न आल्याने भ्रमनिरास होवून शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.कोठारीचे तलाठी नवले यांची बढती होवून बदली झाली. त्यांचा कार्यभार कळमनाचे पटवारी विनोद गणफाडे यांच्याकडे देण्यात आला. तेव्हापासूनच शेतकऱ्यांना विविध कामासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोठारीत नियमित तलाठी देण्याची कार्यवाही महसूल विभागाने अद्यापही केली नाही. सदर तलाठ्याकडे कळमनाचा मुख्य कारभार असून कोठारी साजाचा प्रभार आहे. कळमना येथे भरपूर काम असल्याने कोठारीत नियमित वेळ देणे शक्य होत नसल्याचे संबधित विभागाकडून सांगण्यात येते.कोठारीत पटवारी नियमित देण्यात यावी व शेतकरी व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी. यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही करून स्थायी तलाठी देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कोठारी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर कोटरंगे यांनी दिला आहे.आपल्याकडे कळमना साजाचा कार्यभार असून त्यात भरपूर काम आहे. कोठारीचा प्रभारी कारभार असून नियमीत वेळ देता येत नाही. मात्र नागरिकांचे व शेतकऱ्यांची कामे थांबणार नसल्याची दक्षता घेण्यात येत असल्याची प्रतिक्रिया विनोद गणफाडे यांनी दिली. (वार्ताहर)