शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांंच्या हलगर्जीपणामुळे शाळकरी मुलाचा मुत्यू

By admin | Updated: May 6, 2016 00:57 IST

जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्दीपणामुळे एका ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला.

रुग्णालयाची तोडफोड : जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात तणावजिवती : जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्दीपणामुळे एका ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी करीत मृतदेह उचलण्यास नातेवाईकांनी नकार दर्शविला. यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नोकेवाडा येथील विष्णू खांडेकर यांचा मुलगा शिवम विष्णू खांडेकर (११) याला दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने गावातील आरोग्य सेविका यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. तिथे तपासणीसाठी त्याचे रक्त घेऊन औषधी देण्यात आली. परंतु ताप कमी होत नसल्याने मुलाच्या आईने शिवमला जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी रक्त तपासणी केली व तात्पुरता उपचार करुन घरी जाण्यास सांगितले. औषधी घेतल्यावर शिवमला काही वेळ बरे वाटू लागले. मात्र रात्र झाल्यावर पुन्हा तब्बेत बिघडली. पुन्हा तातडीने शिवमला जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र यावेळी डॉक्टरांनी वेळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांना काही तास जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रातच थांबावे लागले. काही तासानंतर इंजेक्शन देऊन त्याला पुढील उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथेही तात्पुरता उपचार करुन चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत शिवमची प्रकृती हाताबाहेर गेली होती. बराच वेळ झाल्याने अखेर शिवमचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शिवमचा जीव गेला, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी के.जी. कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी योग्य औषधोपचार केला. त्यानंतर त्याला गडचांदूरला हलविल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी) वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीमाझ्या मुलाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. के. जी. कोरडे यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवून निलंबनाची कारवाई करा, अन्यथा मुलाचे प्रेत दवाखान्यासमोरुन हटवणार नाही, अशी भूमिका मुलाचे वडील विष्णू खांडेकर व त्याच्या नातेवाईकांनी घेतली. यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी घघटनास्थळी पोहचून नातेवाईकांची सांत्वना केली. संबंधित डॉक्टरावर चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले व जिवती पोलिसांना संबंधित डॉक्टराच्या विरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर शिवमचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.