शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक तालुक्यात कामगारांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: March 16, 2017 00:46 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

परप्रांतीयांचा भरणा : बेरोजगारीच्या समस्येत वाढ; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजआवाळपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. मात्र स्थानिक कामगारांना काम नसल्याने आणि सिमेंट कारखान्यातील कामगारांना कामावरून काढत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने नामवंत सिमेंट उद्योग समुहांनी प्रकल्पांची उभारणी केली आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या मुलांना रोजगार मिळेल, या आशेवर त्यांनी शेती अल्पदरात त्या उद्योगांना उपलब्ध केली. त्या मोबदल्यात काही लोकांना रोजगार देण्यात आला. त्यावेळी गावकऱ्यांनी सिमेंट उद्योगाचा कोणताही दुष्परिणाम लक्षात न घेता त्यांचे स्वागतच केले. त्यामुळे तेथे कारखाने सुरु झाले. त्यातून कोट्यवधीचे उत्पादनही होऊ लागले.मात्र त्यानंतर आश्वासन दिल्याप्रमाणे येथील गावांचा विकास आणि स्थानिक नागरिकांना कुशल कामगार म्हणून नियुक्ती देताना कंपनीने आपला रंग दाखवण्यास सुरूवात केली.काही स्थानिक कामगारांनी १५ वर्षे संघर्ष केला. आजही काही कारखान्यात कामगारांची दयनीय स्थिती दिसून येते. कारखान्यांनी शेतजमिनी अल्प दरात घेवून नोकरी देण्याची कबुली केली होती. मात्र अजूनही स्थानिक युवकांना कुशल कामगार म्हणून घेण्यात आले नाही. त्यांना डावलून त्यांचावर अकुशल कामगार म्हणून ठपका लावला जातो. त्याच वेळी कुशल कामगार म्हणून परप्रांतीयांचा भरणा केला जातो. स्थानिक सुशिक्षित बेरोजगाराची फौज निर्माण झाली असून त्यांच्या हाताला काम नाही. या कारखान्यांमधील कामगारांनी कामगार संघ स्थापन केले आहेत. परंतु तेदेखील नाममात्र झाले आहेत. त्यांचा दबाव नसल्याने कारखान्यात परप्रांतीय कामगारांचा भरणा वाढतच चालला आहे. या सर्व समस्येवर मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी कायमचे दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर) १५ दिवसांतून एकदा कामतालुक्यातील कारखान्यांमध्ये रोजगार मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक शहरामध्ये तंटपुज्या मानधनावर काम करीत आहे. तांत्रिक कुशल व अकुशल युवक आपल्याला स्थानिक कंपनीमध्ये रोजगार मिळेल, या आशेवर जगत आहेत. आजही काही कारखान्यात रोटेशन तत्वावर जवळपास ५०० कामगार काम करीत आहेत. त्यांना कधी कामावर घेतले जाते तर कधी १५ दिवसांमधून एखाद्या दिवशी काम दिले जाते. कामगाराच्या हाताला काम नसल्याने ते भाजीपाला, घर बांधकाम आणि टॅ्रक्टरचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवित आहेत. प्रदूषणामुळे विविध आजारकारखान्याच्या विषाक्त धुरांमुळे वातावरण प्रदूषित होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजाराने ग्रासले आहेत. प्रदूषणामुळे कारखान्याजवळील शेतीलासुद्धा त्याचा मोठा फटका बसत आहे. प्रदूषणामुळे पिकावर प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट होत आहे.