शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कानपा परिसरात दुष्काळाचे सावट

By admin | Updated: December 6, 2014 22:46 IST

नागभीड तालुक्यातील कानपा परिसर हा धानपट्टा म्हणून ओळखल्या जातो. यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी पीकही

कानपा : नागभीड तालुक्यातील कानपा परिसर हा धानपट्टा म्हणून ओळखल्या जातो. यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी पीकही हातचे जाण्याची शक्यता आहे. परिणामी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कानपापासून काही अंतरावर असलेल्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचाही या परिसरातील शेतीला सिंचनासाठी फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. यावर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील धानाची पेरणी खोळंबली. पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. रोवणीच्या वेळी अपेक्षेनुरूप पाऊस न पडल्याने काही शेतकऱ्यांनी जिवाचा आटापीटा करून मोटारपंपाच्या सहाय्याने नदी, नाल्यातील पाणी ओढून रोवणी केली. ऐन पीक भरात असताना पावसाने दगा दिला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, अशांनी शेत सिंचन करून पिक वाचविण्याची धडपड केली.असे करूनही शेतकऱ्यांचे हाती पीक आले नाही. जनावरांना वर्षभर पुरेल इतके वैरणही निघाले नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी शेतकरी वर्षभराची चिंता करू लागला आहे. संसाराचा गाडा, घेतलेले कर्ज, मुलामुलींचे शिक्षण, विवाह, वर्षभर जनावरांच्या वैरणाची व्यवस्था, खरीप पिकाकरिता बि-बियाणे, खते व किटकनाशकांचे नियोजन आदींची चिंता कानपा व परिसरातील शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे.सातत्याने येणाऱ्या संकटांना अंगावर झेलत बळीराजा मोठ्या अपेक्षेने शेतीचे नियोजन करतो. परंतु त्याचे फुटके नशीब त्याला साथ देत नाही. परिसरातील काही वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून ५०-६० वर्षाच्या काळात यावर्षी सारखी परिस्थिती कधीच पाहिली नाही. ज्या शेतकऱ्यांना दरवर्षी १०० पोती व्हायची त्याच जागी १५-२० पोती धानावर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे? वर्षभर संसार चालवायचा कसा? असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागले आहेत.गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांवर कोणते ना कोणते संकट ओढवत आहे. कधी ओल दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेतकऱ्याच्या समस्यांकडे लक्ष देवून शासनाने योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)