शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिवतीला जानेवारीपासूनच बसताहेत दुष्काळाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:55 IST

शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.

ठळक मुद्देदुष्काळाने तालुका बकाल : जलस्रोतही पडले कोरडे

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.शेणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घनपठार गावात ६० घरांची वस्ती असून तीनशेच्या जवळपास येथील लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. गेल्या २०- २५ वर्षांपूर्वी झºयातील पाण्यावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून पाईप लाईनद्वारे गावात पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी त्या महत्त्वाकांक्षी योजनेचा काही वर्षातच बट्टयाबोळ झाला. पुन्हा त्या नागरिकांना झऱ्यातील पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ आली. अनेक वेळा मागणी केल्यानंतर गावात पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विहीर व पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही त्या योजनेचे काम पुर्ण झाले नाही. आतातरी पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष दूर होईल अशी आशा बाळगणाऱ्या नागरिकांचे स्वप्न धुळीस मिळाले.जनावरांचेही होताहेत हालअतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात दरवर्षीच निसर्गाचा पाऊस दगा देतो. यावर्षीसुध्दा तीच परिस्थिती निर्माण झाली. सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाला. मात्र नंतर परतीच्या पावसाने पुर्णत: पाठ फिरविल्याने शेतकºयांना पाहिजे तसे उत्पन्न घेता आले नाही. शेतकरी संकटात सापडला असतानाच आता पाणी टंचाईने डोके वर काढल्यामुळे माणसांबरोबर आता जनावरांना जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहेत. खरीप हंगामाने धोका दिला यातून सावरण्यासाठी काही शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. मात्र सततच्या वातावरणातील बदलामुळे आणि हुडहुडीमुळे रब्बी हंगामावरही निसर्ग कोपतो की काय, अशी शंकाच वर्तवली जात आहे. असे जर झाले तर जनावरे जगवायची कशी, या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी बेभाव किमतीत जनावरे विकत असल्याचेही बोलले जात आहे.तालुक्यातील अनेक गावे तहानलेलीच!घनपठारच नव्हे तर तालुक्यातील घोडणकप्पी, चलपतगुडा, टेकामांडवा, पोचुगुडा, खडकी, अंतापूर, पिटीगुडा अशी अनेक गावे दरवर्षीच पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असतात. यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे घनपठारसह अनेक गावात जानेवारी महिन्यांपासून पाणी टंचाईची झळ पोहोचली असून संबंधित अधिकाºयांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशा गावात तातडीने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.