शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दारु पिऊन शिक्षकाचा धिंगाणा

By admin | Updated: October 24, 2016 00:54 IST

येथील पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कन्हाळगाव शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मोढे या शिक्षकाचे अनेक कारनामे चर्चेत आहेत.

कोरपना : येथील पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कन्हाळगाव शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मोढे या शिक्षकाचे अनेक कारनामे चर्चेत आहेत. त्यांच्याविरोधात गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी पंचायत समितीकडे असताना त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. अशातच दारू पिऊन शाळेतच धिंगाना घातल्याचा प्रकार त्यांच्याकडून घडला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक गावे दारु बंदी करुन दारु मुक्तीकडे वाटचाल करताना दिसत आहेत. मात्र कन्हाळगाव जि.प. शाळेत शिक्षक मोढे कर्तव्यावर असताना वर्गात दारूची बॉटल व पाण्याची बॉटल घेऊन टेबलावरच मद्य प्राशन केल्याचे निर्दशनास आले. हा प्रकार तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून चित्रफीत वायरल झाल्यामुळे गावागावात चर्चेला उत आला आहे. अशा शिक्षकाकडून आदर्शाचे धडे कसे घ्यावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. या प्रकारामुळे पालकामध्ये रोष पसरला असून सरपंच विनोद नवले, आबीद अली, रमेश मालेकर, वासुदेव आवारी यांनी संवर्ग विकास अधिकारी कोरपना यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाचे कथन केले व सदर शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा कन्हाळगावच्या गावकऱ्यांनी दिला. संबंधित तक्रार व चित्रफीत मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंग यांना पाठवण्यात आल्याची माहिती कन्हाळगावचे विनोद नवले यांनी सांगितले. याबाबत जिल्हा प्रशासन काय कारवाई करते, याकडे कन्हाळगाव वासीयांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)