शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी शिक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण

By admin | Updated: August 14, 2016 00:25 IST

ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथून जवळच असलेल्या तुलानमाल (मेंडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ...

तुलानमाल येथील घटना : पालकांची पोलिसांत तक्रारमेंडकी : ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथून जवळच असलेल्या तुलानमाल (मेंडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक नरेंद्र शंकर भोले यांनी आपल्या शाळेतील चार विद्यार्थ्यांना मद्यधुंद अवस्थेत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडलीे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.शिक्षक नरेंद्र भोले यांनी इयत्ता तिसरीतील नेहा श्रीधर हणवते, मंदीप मधुकर जगतापे, राकेश अनिल आंबोने आणि इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी वैष्णवी विनोद आत्याम यांना वर्गात बेदम मारहाण केली असून विद्यार्थ्यांच्या पायावर तसेच हातावर मारण्याचे व्रण उमटले आहेत. विद्यार्थ्यांचे वडील, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी व काही प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थ्यांसह मेंडकी येथील उपपोलीस ठाण्यात तक्रार दिली.शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना गिरवणारा शिक्षक दारू पिऊन विद्यार्थ्यांना ज्ञान देत असेल तर विद्यार्थ्यांनी या शिक्षकाकडून काय शिक्षण घ्यावे, असा प्रश्न येथील विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे. सहायक शिक्षक नरेंद्र भोले यांनी यापूर्वी असेच कारनामे केले होते. त्याची तक्रार शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश जगतापे, उपाध्यक्ष प्रमोद अलोने व समितीच्या सदस्यांनी गटशिक्षणाधिकारी तसेच ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केली. परंतु या अधिकाऱ्यानी चौकशी केली नाही. सदर मद्यपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी केली आहे. या शिक्षकाची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. अन्यथा जनआंदोलन करून शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांसमवेत काही प्रतिष्ठित नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)शिक्षकाने काढला पळशाळेत घडलेला प्रकार सुटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सायंकाळी आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आई-वडील तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश शंकर जगजापे, उपाध्यक्ष प्रमोद नामदेव अलोने व इतर सदस्यांनी शनिवारी सकाळी ८ वाजता शाळेवर हल्लाबोल केला. घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला असता शिक्षक नरेंद्र भोले यांनी घडलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून शाळेतून पळ काढला. संबंधित घटनेची लेखी तक्रार अद्याप गट शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेली नाही. या शाळेच्या मुख्याध्यापकाने फोनवर माहिती दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी करण्यात येईल.- दामोधर सेलोकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, ब्रह्मपुरी.